29 March 2024 3:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

Microsoft Internship 2021 Program | मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप 2021 | असं करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन

Microsoft Internship 2021 Program

मुंबई, २३ सप्टेंबर | मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप 2021 ची घोषणा करण्यात आली आहे. एआयसीटीई ट्यूलिप या पोर्टल वरून इच्छुकाना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध आहे. या इंटर्नशिपसाठी एकूण 50,000 ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि फ्युचर रेडी यांनी हा टॅलेंट प्रोग्राम जाहीर केला आहे. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी ही एक ऑनलाईन इंटर्नशिप प्रोग्रामची संधी आहे.

Microsoft Internship 2021 Program, मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप 2021, असं करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन – Microsoft India Summer Research Internship Program 2021 online registration on AICTE TULIP portal :

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), FutureSkills Prime-a NASSCOM आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) डिजिटल कौशल्य उपक्रम, अर्न्स्ट अँड यंग (EY), GitHub आणि Quess Corp च्या भागीदारीत ही इंटर्नशिप दिली जात आहे. फ्युचर रेडी टॅलेंट ही ऑनलाईन इंटर्नशिप आहे. in-demand azure cloud आणि उद्योग विश्वाशी संबंधित security स्किल शिकण्याची संधी आहे. व्यावसायिक आव्हाने सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. इंटर्नशिप यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रही मिळणार आहे.

ह्या इंटर्न शिपसाठी कोण अप्लाय करू शकतं?
2022 आणि 2024 या काळात कामावर रुजू होऊ पाहणाऱ्या आणि उच्च शिक्षित असणाऱ्या जवळपास 1.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना ह्या संधीचा फायदा उपलब्ध करून देणे हा मायक्रोसॉफ्टचा हेतू आहे. कोणत्याही स्पेशलायझेशन मध्ये डिग्री असणारे विद्यार्थी या इंटर्नशिपसाठी अप्लाय करू शकतात. 8 आठवड्यांचा पूर्ण वेळ ह्या इंटर्नशिपसाठी देणे आवश्यक आहे. अर्जदारांकडे संबंधित कौशल्ये आणि आवडी असणे आवश्यक आहे.

मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप 2021 साठी अर्ज कसा करावा?
या संधीसाठी अर्ज करण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना 29 सप्टेंबर 2021 पूर्वी एआयसीटीई ट्यूलिप पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. अर्जदाराच्या कॉलेजचे नाव, विद्यार्थी आयडी, नाव, राहण्याचे शहर, ईमेल आयडी, मोबाईल नंबर देऊन ट्यूलिप पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचा ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून इंटर्नशिपसाठी अप्लाय करावे. ज्यांना अधिक जाणून घ्यायचे आहे त्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

Online Register: Click Here OR Copy Link: https://internship.aicte-india.org/internship-details.php?uid=INTERNSHIP_163185424661441ea6ad128&level=4

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Microsoft India Summer Research Internship Program 2021 online registration on AICTE TULIP portal.

हॅशटॅग्स

#Microsoft(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x