19 April 2024 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

खोटं रडून दाखवता, आता ताईंगिरी कुठे गेली? | फोन बंद का? | किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांना झापलं

Chitra Wagh

मुंबई, २३ सप्टेंबर | भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानतंर आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कायदा सुव्यवस्थेवरुन भाजपच्या 12 महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सडेतोड प्रश्न विचारले होते.

खोटं रडून दाखवता, आता ताईंगिरी कुठे गेली?, फोन बंद का?, किशोरी पेडणेकर यांनी झापलं – Molestation in BJP’s woman corporator office at Mumbai Borivali Mumbai mayor Kishori Pednekar attacks on Chitra Wagh :

म्हणून पोलिसांत केली तक्रार:
पक्षात पद देतो, असे सांगून स्थानिक भाजपा पदाधिकारी प्रतीक साळवी याने एका महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेल्या तक्रारीवरून बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महिलेने याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारही केली होती. मात्र, याची दखल न घेतल्याने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अनेक प्रश्न उपस्थित करताना भाजपाला आणि चित्रा वाघ यांना खडेबोल सुनावले आहेत. भाजपच्या महिला आता गप्प का? दिव्याखाली अंधार आहे. भाजप नेहमीच महाराष्ट्राला बदमान करण्याचा प्रयत्नात असते. खोटं रडून दाखवता. भाजपशासित राज्यात महिलां अत्याचाराच्या घटना खूप घडत आहेत. आता ताईंगिरी कुठे गेली? फोन बंद का? असा हल्लाबोल महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर केला.

मी स्वत: बोरिवलीच्या प्रकरणात लक्ष घालणार आहे, पोलिस स्टेशनला जाणार आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. केवळ महाराष्ट्र बदनाम करण्याचं काम भाजपकडून होतं. भाजपच्या ताई पब्लिक स्टंटसाठी पुढे येणार आणि आता गप्प बसणार? आज महिलांच्या विषयावर धाय मोकलून रडणा-या भाजपच्या ताईंचा फोन सकाळपासूनच स्विच ऑफ आहे, त्यांच्या पक्षातील कुणीच याबाबत बोलायला तयार नाही. कोणत्याही पक्षाची महिला असो, अन्याय होत असेल तर भूमीका घेतली पाहिजे, मी असते तर थोबाड फोडून टाकलं असतं, असा हल्लाबोल किशोरी पेडणेकर यांनी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Molestation in BJP’s woman corporator office at Mumbai Borivali Mumbai mayor Kishori Pednekar attacks on Chitra Wagh.

हॅशटॅग्स

#ChitraWagh(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x