19 April 2024 11:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मला महाराष्टाचा अर्थमंत्री केल्यास २० रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करतो - सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungatiwar

मुंबई, २४ सप्टेंबर | भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर आपले मत व्यक्त केले आहे. राज्यातील जनतेला स्वस्तात स्वस्त पेट्रोल देण्याची इच्छाशक्ती राज्याने दाखवली तर राज्यात पेट्रोलच्या किंमती 20 रुपयांनी कमी होऊ शकतात, असे मत त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मांडले आहे.

मला अर्थमंत्री केल्यास २० रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करतो – I will reduce the rate of petrol by twenty rupees :

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना सरकारकडे नियोजन, अभ्यास आणि इच्छाशक्तीची कमतरता आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे ते म्हणतात की, ‘पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीला केंद्र सरकारला जबाबदार धरणे हे चुकीचे असून, राज्य सरकारने पेट्रोल डिझेलचा समावेश वस्तू व सेवा करात केल्यास पेट्रोलच्या किंमती कमी होऊ शकतात.’

पेट्रोलवर लावण्यात आलेल्या करातून केंद्र सरकारला प्रत्येक लिटरमागे 32 रुपये मिळतात तर राज्य सरकारलाही तितकेच रुपये मिळतात. केंद्राला मिळालेल्या करातून केंद्र सरकार कडून रस्ते विकास, शेतकऱ्यांचे अनुदान तसेच पंचवार्षिक योजना अंतर्गत राज्यांना निधी दिला जातो. तर राज्य सरकार पेट्रोल डिझेलवरील कर कमी करू शकतो, फक्त त्या सरकारची इच्छा असायला हवी असे खोचक विधान त्यांनी केले आहे.

आपल्या वक्तव्यामध्ये पुढे ते म्हणतात की, ’जर मला अर्थमंत्री होऊ दिले तर मी वीस रुपयांनी पेट्रोलच्या किमती कमी करून दाखवेन. महाविकास आघाडी सरकारला निर्णय घेता येत नसल्याने पेट्रोलचे दर चढले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे.’

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Make me finance minister I will reduce the rate of petrol by 20 rupees said Sudhir Mungantiwar.

हॅशटॅग्स

#SudhirMungantiwar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x