20 April 2024 10:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
x

पेट्रोलपंपवर १०० लिटरने पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली - अजित पवार

petrol diesel price

बारामती, २५ सप्टेंबर | पेट्रोल-डिझेल दरात आज कोणतेही बदल झालेले नाहीत. IOCL वेबसाइटनुसार, आज शनिवारी देशभरात इंधन दर स्थिर आहे. यापूर्वी शुक्रवारी डिझेलच्या दरात 22 पैसे प्रति लीटरपर्यंत वाढ झाली होती. तर पेट्रोल दर स्थिर ठेवण्यात आले होते. पेट्रोल किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नव्हते. या वाढीसह आज राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा दर 101.19 रुपये आणि डिझेलचा भाव 88.82 रुपये प्रति लीटर आहे.

पेट्रोलपंपवर १०० लिटरने पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली – Deputy CM Ajit Pawar criticize to PM Narendra Modi over high petrol rates :

पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं, की देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होत नाहीत, कारण राज्य इंधन GST कक्षेत आणू इच्छित नाहीत.

दुसरीकडे याच विषयाला अनुसरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आणि मोदींची खिल्ली उडवली आहे. आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून अनेक उत्तम प्रकारे काम करणारे पंतप्रधान आपल्या देशाला मिळाल्याचे पाहिले. आता पंतप्रधान पदावर मोदी साहेब आहेत. त्यांनी अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा (मोदींचा) फोटो लावायचाच असा नियम केला आहे. त्यामुळे आम्ही गमतीने असे म्हणतो की पेट्रोल १०० च्या पुढे गेलं.. की पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं… मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली.. घाल आता १०० रुपयाचे पेट्रोल असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. येथील एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी पवार बोलत होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Deputy CM Ajit Pawar criticize to PM Narendra Modi over high petrol rates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x