24 April 2024 8:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

MP Bhavana Gawali Vs ED | शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचं समन्स

MP Bhavana Gawali

वाशीम, २९ सप्टेंबर | शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी भावना गवळींच्या (Shivsena MP Bhavana Gawali ED Notice) कंपनीच्या संचालकाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. आता भावना गवळींना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

The Enforcement Directorate (ED), late on Monday, arrested Saeed Khan, an aide to Bhavana Gawali, the Shiv Sena Member of Parliament (MP) from Maharashtra’s Yavatmal Washim, in connection with a money laundering case :

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संबंधित असणाऱ्या 9 ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. परभणी येथील पाथरी याठिकाणी ईडीने मोठी कारवाई केली होती. यानंतर भावना गवळींचे निकटवर्तीय असणाऱ्या सईद खान यांना अटक करण्यात आली होती. महिला प्रतिष्ठान या ट्रस्टचे कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. सईद खान हे या कंपनीचे संचालक आहेत. यानंतर आता भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावला आहे.

या प्रकरणात सुरू आहे चौकशी?
वाशीम जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसैनिक आडकाठी आणत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर गवळी यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. गवळींनी 55 कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना 25 लाख रुपयात घेतला आहे. सन 2019 मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून 7 कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी केली होती. 7 जुलै 2019 रोजीच्या चोरीची तक्रार 12 मे 2020 रोजी करण्यात आली.

दरम्यान, 10 महिने उशिरा तक्रार देण्याचे कारण काय? त्या कार्यालयात 7 कोटी कुठून आले? असे सवाल सोमय्या यांनी केले होते. या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री, सीबीआय, ईडी, स्टेट बँक, नॅशनल को-ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व अन्य ठिकाणी तक्रारी केल्या आहेत. मुंबई येथील ईडीची पथके रिसोड येथे 30 ऑगस्ट रोजी सकाळी दाखल झाली. भावना गवळींच्या रिसोड अर्बन सहकारी पतसंस्था, आयुर्वेद महाविद्यालय, भावना पब्लिक स्कूल, डी.फॉर्म महाविद्यालय, पुंडलिकराव गवळी महाविद्यालय, शिरपूर जैन या संस्थांमध्ये धाडी टाकण्यात आल्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Shivsena MP Bhavana Gawali summon by ED in money laundering case.

हॅशटॅग्स

#BhavanaGawali(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x