16 April 2024 9:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

एकाच दिवशी दोन परीक्षा? | पण आरोग्य विभाग आणि TET दोन्ही परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार झालाय का?

Maharashtra Health department exam and TET exam

मुंबई, २९ सप्टेंबर | आरोग्य विभागाची भरती परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने मोठा गदारोळ झाला. अखेर आरोग्य विभागाकडून गट ‘क’ साठी २४ तर गट ‘ड’ साठी ३१ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र त्याच दिवशी राज्य परीक्षा परिषदेची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण (Health Department exam and TET exam) निर्माण झाले आहे. परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण संचालकांशी आपण बोलून मार्ग काढणार आहोत. उमेदवारांचे नुकसान होऊन देणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

The health department has fixed October 24 for group ‘C’ and October 31 for group ‘D’. However, the Teacher Eligibility Test (TET) of the State Examination Council will be held on the same day. As both the exams are held on the same day, an atmosphere of confusion has been created among the candidates :

आयटी कंपनीच्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली होती. मात्र त्यातून आरोग्य विभागाने मार्ग काढत २४ व ३१ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. मात्र त्याचदिवशी शिक्षण विभागाकडून टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सर्व शिक्षकांसाठी बंधनकारक असून, यापूर्वी ही परीक्षा १० ऑक्टोबरला होणार होती. मात्र त्याचदिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ही परीक्षा ३१ ऑक्टोबरला पुढे ढकलण्यात आली आहे. त्यातच आता आरोग्य विभागाची परीक्षाही त्याच दिवशी होणार आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व टीईटीची परीक्षा देणार्‍या उमेदवारांना दोन्ही परीक्षा देणे शक्य होणार नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

उमेदवारांचे नुकसान होऊ नये:
उमेदवारांचे नुकसान होणार नाही याची सरकारकडून काळजी घेण्यात येईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बोलून टीईटी परीक्षेच्या तारखेबाबत विचार करण्याची त्यांना विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. मुलांचे नुकसान होऊ नये, म्हणून शिक्षण संचालकांशीही बोलणार आहे. अजून एक महिना आहे. यातून मार्ग काढला जाईल, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Maharashtra Health department exam and TET exam on same day increases confusion of students.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x