29 March 2024 5:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

MP Bhavana Gawali | भावना गवळी वर्षावरून मुख्यमंत्र्यांची भेट न होताच परतावे लागले

MP Bhavana Gawali

मुंबई, ०१ ऑक्टोबर | ईडीच्या नोटिशीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी म्हणून भावना गवळी (MP Bhavana Gawali) मुंबईला वर्षावर गेल्या. त्यांना एक तास प्रतिक्षा करावी लागली पण अखेर मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नाही. या भेटीविनाच त्यांनामाघारी परतावे लागले असे समजते.

MP Bhavana Gawali visited Varsha Niwas to meet CM Uddhav Thackeray after facing the ED’s notice. She had to wait for an hour but did not get a meeting with the CM. Then she had to return home without meeting CM Uddhav Thackeray :

खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या वरून भावना गवळी यांना ईडीचे समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे भावना गवळी यांना आता ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

मात्र त्याआधी भावना गवळी ह्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शुक्रवारी, १ ऑक्टोबर रोजी वर्षा बंगल्यावर गेल्या होत्या. मात्र १ तास त्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले. त्यानंतर मात्र त्या मुख्यमंत्र्यांना न भेटताच परत माघारी फिरल्या, त्यामुळे शिवसेनेकडून भावना गवळी यांना “वर्षा”वरून वाऱ्यावर सोडण्यात आले आहे काय?, अशी चर्चा शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळात आता सुरु झाली.

१०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप:
खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीने गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या यवतमाळ व वाशिम येथील पाच संस्थांवर याआधीच छापे टाकले होते. वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीने येथून अनेक कागदपत्रे जप्त केली होती. भावना गवळी यांच्याशी संबंधित पाच संस्थांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्याशिवाय, गवळी यांच्या एका संस्थेच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार स्वत: गवळी यांनी केली होती. त्या तक्रारीनंतर सोमय्या यांनी गवळी यांच्यावर निशाणा साधला होता. इतके पैसे गवळी यांच्याकडे आले कुठून, असा सवाल त्यांनी केला होता. तसेच, चौकशीची मागणीही केली होती. तेव्हापासून गवळी ईडीच्या रडारवर असून त्यांच्यावर झालेल्या आरोपांची शहानिशा ईडीकडून केली जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title : MP Bhavana Gawali do not got meet opportunity to meet CM Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#BhavanaGawali(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x