20 April 2024 12:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Jitendra Awhad Vs Mahesh Manjrekar on Godse Film | महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान काय?

Jitendra Awhad Vs Mahesh Manjrekar over Godse film

मुंबई , ०३ ऑक्टोबर | अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेवर ते चित्रपट करत असल्याची माहिती त्यांनी दिली. महात्मा गांधींच्या 152 व्या जयंतीच्या मुहूर्तावर महेश मांजरेकरांनी चित्रपटाचा टीजर शेअर केला. मात्र मांजरेकरांच्या या घोषणेनंतर विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी संतप्त प्रतिक्रिया (Jitendra Awhad Vs Mahesh Manjrekar on Godse Film) नोंदवली आहे.

Jitendra Awhad Vs Mahesh Manjrekar on Godse Film. Film director Mahesh Manjrekar has announced his upcoming film on the occasion of Gandhi Jayanti on October 2. He informed that he was making a film on Nathuram Godse, the assassin of Mahatma Gandhi. Minister Jitendra Awhad objected to Mahesh Manjrekar’s film. Who is Mahesh Manjrekar tweeting? What is his contribution to Indian cinema? That is the question :

मांजरेकरांच्या चित्रपटावर आव्हाडांनी आक्षेप नोंदवला. त्यांनी ट्वीट करत महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचे योगदान काय? असा सवाल केला आहे. यासोबतच लोकांचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेलं हे नाटक असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

काय म्हणाले होते मांजरेकर?
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीच्या मुहूर्तावर अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी ‘गोडसे’ या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. तसेच ‘वाढदिवसाच्या सर्वात घातक शुभेच्छा! यापूर्वी कोणीही सांगण्याचे धाडस केले नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा!’ संदीप सिंग, राज शांडिल्य आणि महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींच्या 152 व्या जयंतीनिमित्त ‘गोडसे’ सिनेमाची घोषणा केली.

यावेळी मांजरेकर म्हणाले की, नथुराम गोडसेची कथा नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळची आहे. अशा स्वरुपाच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी खूप धैर्य लागते. कठीण विषयांवर आणि बिनधास्त गोष्टींवर माझा नेहमीच विश्वास आहे. सिनेमाचे हे कथानक अशाच पद्धतीचे आहे. महात्मा गांधींवर गोळीबार करणारी व्यक्ती, या ओळखीशिवाय त्यांच्याबद्दल कुणालाही जास्त माहिती नाही. त्यांची कथा सिनेमामधून सांगत असताना, कुणालाही पाठिशी घातलेले नाही ना कुणाच्या विरोधात भाष्य केले आहे. योग्य काय अयोग्य काय आहे ते प्रेक्षकांवर आम्ही सोडले असल्याचे मांजरेकर म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Jitendra Awhad Vs Mahesh Manjrekar over Godse film announcement.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x