Arvind Trivedi Passes Away | रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन
मुंबई, ०६ ऑक्टोबर | टीव्ही जगतातील ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन (Arvind Trivedi Passes Away) झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. त्रिवेदी यांनी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारली होती.
Arvind Trivedi Passes Away. who played the role of Ravana in the popular TV serial ‘Ramayana’, has passed away. He was 82 years old. Trivedi had played the role of Ravana in Ramanand Sagar’s ‘Ramayana’ :
मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमी येथे अरविंद त्रिवेदी यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, मात्र, काल रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनीही त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
रामायण मालिकेमध्ये रावनाची जबरदस्त भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांच्या इतरही काही भूमिका अत्यंत लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांनी टीव्ही मालिका ‘विक्रम आणि वेताळ’मध्येही काम केले होते. ही मालिकाही बरीच गाजली होती.
अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन येथे झाला होता. त्यांनी कारकिर्दीची सुरुवात गुजराती रंगमंचावरून केली होती. त्यांचे भाऊ उपेंद्र त्रिवेदी हेदेखील गुजराती सिनेमांतील एक चर्चित नाव आहे. गुजराती भाषेतील धार्मिक आणि सामाजिक सिनेमांतून अरविंद त्रिवेदी यांना एक विशेष ओळख मिळाली. त्यांना त्यांच्या जबरदस्त अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Arvind Trivedi Passes Away at age of 82.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार
- Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
- Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर पुढे मजबूत कमाई करून देईल, टार्गेट प्राईस जाणून घ्या
- Paytm Share Price | पेटीएम शेअर्सची घसरण वाढली, स्टॉक घसरणीचे कारण काय? पुढे काय होणार?
- Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 4 महिन्यात 270% तर एका वर्षात 920% परतावा दिला, फायदा घेणार?
- SBI FD Interest Rates | सरकारी SBI बँकेची मजबूत परतावा देणारी FD योजना, बचतीवर मोठा व्याज दर मिळेल
- Penny Stocks | गरीबही खरेदी करू शकतील असे चिल्लर किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स, अल्पवधीत मोठा परतावा मिळवा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर