29 March 2024 1:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

सावधान! आता सीएनजी तसेच घरगुती वापरातील पीएनजी गॅस सुद्धा महागणार?

नवी दिल्ली : आधीच डॉलरच्या तुलनेत घसरत असलेल्या रुपयामुळे इंधनाच्या म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या किमती प्रचंड वाढून महागाईचा भडका उडाला आहे आणि त्यात सामान्य माणूस पुरता होरपळून निघाला आहे. त्यात आता सीएनजी तसेच घरगुती वापरातील पीएनजी गॅस सुद्धा महागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सामान्यांच्या घरगुती वापरासाठी असलेल्या पीएनजी गॅसची किंमत येत्या ऑक्टोबर महिन्यात ठरविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या गॅसच्या मूळ दरामध्ये प्रतियुनिट १४ टक्के म्हणजे ३.५ डॉलरने तब्बल २५२ रुपये इतकी वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी मार्च २०१६ मध्ये गॅसच्या किमतीत सर्वाधिक ३.८२ डॉलरने वाढ झाली होती. दरम्यान, नैसर्गिक वायुची किंमत अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि रशियातील सरासरी दराच्या आधारे दर सहा महिन्यांनी निश्चित करण्यात येतात. त्यात मागील काही दिवसांपासून रुपयाची किंमत घसरली असून त्याचा फटका थेट सामान्य ग्राहकांना बसणार आहे.

त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे आधीच महागाईने होरपळलेल्या सामान्य माणसासाठी रोजच जगन सुद्धा मुश्किल होण्याची शक्यता आहे असच एकूण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्र दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x