20 April 2024 5:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

भाजपच्या 'विकासा'च्या दिखाव्या विरुद्ध नेटकऱ्यांनी उपसले मार्मिक 'राज अस्त्र'? सविस्तर

नवी दिल्ली : मागील निवडणुकीत म्हणजे २०१४ मध्ये भाजपने विकासाच्या नावावर निवडणुका लढवल्या आणि भ्रष्टाचाराच्या नावाने रान उठवून काँग्रेसला सत्तेबाहेर फेकलं होत. त्यानंतर सुद्धा भाजपने ज्या काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आग ओकली होती, त्यातील आज किती जण तुरुंगात आहेत हा प्रश्नच आहे. इतकंच नाही तर ज्या २ स्पेक्ट्रम घोटाळ्याचा आरोप भाजपने केला होता, त्यांना भाजपच्या राजवटीतच न्यायालयाने दोष मुक्त केलं आहे.

वास्तविक २०१४ पासून कोणत्या विकासाची सुरुवात भाजपने केली आहे ते अजूनही सामान्यांसाठी कोडंच आहे. अच्छे दिन तर दूरच राहिले, परंतु त्याउलट महागाईने आधीच सीमा ओलांडल्याने सामान्यांचं रोजच जगणंच कठीण झालं आहे. रोजचा लागणार भाजीपाला ते पेट्रोल असं सर्वच महाग झाल्याने सामान्यांच आर्थिक गणित नेहमीच चुकत आहे. देशात जी काही प्रगती आणि विकास दिसत आहे ती केवळ भाजप समर्थकांच्या समाज माध्यमांवर मांडलेल्या फेक फोटोशॉप केलेल्या चित्रांमधून नाहीतर व्हायरल करण्यात आलेल्या पूर्व नियोजित मेसेजेस मध्येच अशी स्थिती आहे.

समाज माध्यमांवरील या भाजप समर्थकांच्या एकूणच प्रतिक्रिया आणि पोस्ट पाहिल्यास ते इतरांना मूर्ख गृहीत धरूनच करत असावेत, असं एकूणच समाज माध्यमांचं निरीक्षण केल्यावर नजरेस पडेल. भाजपचे अध्यक्ष अमित शहा काही दिवसांपूर्वी पुण्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजपच्या समाज माध्यमांवरील प्रतिनिधींचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी विरोधकांना सुज्ञ पद्धतीने उत्तरं आणि प्रतिक्रिया द्याव्या अशी सूचना त्यांच्या प्रतिनिधींना केली होती. तसेच महाराष्ट्रातील सर्व मोठ्या विरोधी पक्षातील नेत्यांना म्हणजे अगदी शरद पवारांपासून इतर सर्वच स्थानिक पक्षातील नेत्यांना समाज माध्यमांवर लक्ष करण्याचे आदेश दिले होते.

परंतु अमित शहांना काय सांगायचं होत ते उमगलं तर ते “भक्त” कसले आणि त्यामुळेच २०१४ पासून ते २०१९ मधील लोकसभा निवडणूका जवळ आल्यातरी त्यांची तीच विकासाची “फोटोशॉप” कला चिरंतर सुरु आहे. त्यामुळे विरोधकांनी सुद्धा त्यांच्या बुद्धीवर जास्त ताण न टाकता भाजपच्या आणि अप्रत्यक्ष भाजप समर्थकांच्या “विकासाच्या” फोटोशॉप राजकारणाला प्रतिउत्तर देण्यासाठी तेच “विकासाचं फोटोशॉप” राजकारण त्यांच्याच विरुद्धच मार्मिक ‘राज-अस्त्राने’ परतविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर सुरु झालेल्या विकासाच्या या मार्मिक टीकेचा सध्या ट्रेंड निर्माण होऊ लागला आहे. त्यासाठी फेसबुक वरील अनेक ग्रुप्स या मार्मिक नीतीचा अवलंब करताना दिसत आहेत.

काय आहेत त्या भाजपच्या विकासाच्या मार्मिक पोस्ट?

 

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x