17 April 2024 2:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

Mahatma Gandhi Asked Savarkar To File Mercy Petitions | महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती

Mahatma Gandhi Asked Savarkar To File Mercy Petitions

नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर | अंदमान तुरुंगात कैद असताना स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी ब्रिटीशांकडे महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच दया याचिका दाखल केली होती, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी (Mahatma Gandhi Asked Savarkar To File Mercy Petitions) म्हटलं आहे. वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन,या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राजनाथ सिंह बोलत होते. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये रूपा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

Mahatma Gandhi Asked Savarkar To File Mercy Petitions. Defence Minister Rajnath Singh said it was on Mahatma Gandhi’s request that he wrote mercy petitions to the British and people from the Marxist and Leninist ideology wrongly accuse him as a fascist :

सावरकर यांच्याविरोधात अनेक खोट्या गोष्टी पसरवण्यात आलेल्या आहेत. सावरकर यांनी अंदमान निकोबार तुरुंगातून सुटका व्हावी, यासाठी ब्रिटिशांकडे दया याचिका दाखल केली होती, असे पसरवण्यात आले. मात्र, त्यांनी सुटकेसाठी दया याचिका दाखल केल्या नाही. सामान्यपणे एका कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. महात्मा गांधी यांनी सावरकर यांना दया याचिका दाखल करण्यास सांगितले होते. त्यांच्या सांगण्यावरून सावरकर यांनी दया याचिका दाखल केली होती, असे राजनाथ सिंह म्हणाले.

वीर सावरकर महान स्वतंत्रता सेनानी होते. त्यांना एका विशिष्ट विचारधारेच्या चष्म्यातून पाहणे योग्य नाही. असे केल्यास त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केल्यासारखे होईल. त्यांचा अपमान करणे क्षमा योग्य नाही. वीर सावरकर महानायक होते आणि भविष्यातही राहतील. ब्रिटिशांनी त्यांना दोनदा ना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. यावरून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांची इच्छा शक्ती किती मजबूत होती. हे दिसून येते. काही लोक त्यांच्यावर नाझीवाद, फॅसिस्ट असल्याचा आरोप करते. मात्र, सत्य हे आहे, की असे आरोप करणारे लोक लेनिनवादी, मार्क्सवादी विचारधाराने प्रभावीत होते आणि अद्यापही आहेत. सरळ शब्दात सांगायचे झाले तर सावरकर ‘यथार्थवादी’ आणि ‘राष्ट्रवादी’ होते. ते बोल्शेविक क्रांतीसोबतच लोकशाहीबद्दल बोलत, असे राजनाथ सिंह म्हणाले.

हिंदुत्वाबद्दल सावरकरांचे विचार हे भारताच्या भौगोलिक स्थान आणि संस्कृतीशी संबंधित होते. त्यांच्यासाठी हिंदू हा शब्द कोणत्याही धर्म, पंथाशी संबंधित नव्हता. तर भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक अस्मितेशी संबंधित होता. या विचारावर कोणी आक्षेप घेऊ शकतो. मात्र, विचाराच्या आधारावर तिरस्कार करणे योग्य नाही, असे सिंह म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Mahatma Gandhi Asked Savarkar To File Mercy Petitions said Defence Minister Rajnath Singh.

हॅशटॅग्स

#RajnathSingh(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x