25 April 2024 2:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय
x

NCB Sameer Wankhede | याआधी एअर फोर्सवर एक्साईज विभागात असणाऱ्या वानखेडेंच्या कथा माझ्या कानावर आल्या आहेत

NCB Sameer Wankhede

मुंबई, १३ ऑक्टोबर | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि त्यांच्याकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली. तसेच, अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह गायब आहेत आणि त्यांचा पत्ता अजून लागलेला दिसत नाही, असं देखील पवार यावेळी म्हणाले. यावेळी अनेक मुद्यांना हात घालताना पवारांनी मोजक्या (NCB Sameer Wankhede) पण सूचक शब्दात माहिती दिली;

NCB Sameer Wankhede. NCB Sameer Wankhede was earlier in the Excise Department of the Air Force. There, too, I got to hear some stories about him. But I am not commenting on it as because I do not have complete information about it :

समीर वानखेडेंबद्दल पवारांनी त्यांच्या संपर्कातील लोकांकडून माहिती घेतली:
काही लोकांना आणि पक्षांना बदनाम करण्याची खबरदारी घेतली जात आहे. नवाब मलिक यांनी यापूर्वी काही माहिती दिली. यंदा मला ५४ वर्ष विधिमंडळात होतात. राज्यात किंवा केंद्रात काम करायला २६ वर्ष पूर्ण होतात. आम्ही नेहमीच प्रशासनाशी संबंध चांगले ठेवलेत. नवाब मलिक यांनी एका व्यक्तीविषयी भूमिका मांडली. मी थोडी माहिती घेतली. समीर वानखेडे हे अधिकारी याआधी एअर फोर्सवर एक्साईज विभागात होते. तिथेही काही कथा मला ऐकायला मिळाल्या. पण त्याविषयी पूर्ण माहिती नसल्यामुळे मी त्यावर भाष्य करत नाही. पण या प्रकरणात दोन एजन्सी आहेत. एक एनसीबी आणि दुसरी मुंबई पोलीस. गेल्या काही वर्षांत केंद्राच्या एजन्सीनी किती रिकव्हरी केली तर त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. प्रमाण अतिशय कमी आहे. कुठे पुडी, कुठे काय, कुठे काही ग्रॅम वगैरे. याउलट मुंबई पोलिसांनी केलेल्या जप्तीचं एकूण प्रमाण हे केंद्राच्या एजन्सीपेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यामुळे राज्याची एजन्सी प्रामाणिकपणे काम करते आणि केंद्राची मुंबईतील एजन्सी काहीतरी करतो असं रेकॉर्ड सरकारला देण्यासाठी जे करावं लागेल, एवढंच सीमित काम करतात की काय अशी शंका हे प्रमाण पाहिल्यानंतर येते.

यात काही लोक पकडले आहेत. कुठेही गुन्हा वगैरे घडला, तर पोलीस किंवा केंद्रीय यंत्रण आधी पंचनामा करतात. पंचांच्या समोर लिखापढी होते. अधिकारी करत असलेली कारवाई योग्य आहे याची खात्री वाटावी अशा पद्धतीचे हे पंच असायला हवेत. पण जे कोण गोसावी होते, ते गेले काही दिवस फरार आहेत का काय माहिती नाही. पंच म्हणून ज्यांची निवड केली असेल, ती व्यक्ती समोर यायला तयार नाही, याचा अर्थ त्यांची नैतिकता संशयास्पद दिसत आहे. पण ज्या नार्कोटिक्स एजन्सीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी अशा व्यक्तीची निवड केली, याचा अर्थ या अधिकाऱ्यांचे संबंध कोणत्या प्रकारच्या लोकांशी आहे, हे त्यातून स्पष्ट होत आहे.

अशा प्रकारात आरोप केल्यानंतर त्यावर खुलासा करण्यासाठी सगळ्यात आधी भाजपाचे नेते होते. मला कळेना की ही जबाबदारी, हे काँट्रॅक्ट भाजपाच्या नेत्यांनी कधी घेतली. त्यात नुसतेच ते येतात असं नाही. एका ठिकाणी छापे टाकले, त्याबाबत एक विधान एका केंद्रीय राज्यमंत्र्याचं होतं की हे आमचंच काम आहे. मला माहिती नव्हतं.. सरकारमध्ये काम केलं आहे मी. पण हे आमचंच काम असतं ही आमच्या ज्ञानात त्यांनी भर टाकली. ते मला कुठे भेटले, तर जाहीरपणे आभार मानेन त्यांचे. पण मुद्दा हा आहे की शासकीय यंत्रणेकडून सत्तेचा गैरवापर होत असेल, तर त्याचं समर्थन करताना भाजपाचे लोक दिसतायत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: NCB Sameer Wankhede a past input indirectly highlighted by Sharad Pawar.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x