महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य: राम कदमांची उमेदवारी भाजपच्या मुंबईतील सर्व उमेदवारांना भोवणार?
मुंबई : भाजपचे घाटकोपरचे वादग्रस्त आमदार राम कदम यांची विधानसभेची उमेदवारी भाजपच्या मुंबईतील सर्वच उमेदवारांना भोवण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. महिला मतदार हा मतदान प्रक्रियेत महत्वाचा घटक समजला जातो. अर्थकारणाच्या जोरावर त्यांनी मतदारसंघात निवडणूक प्रेरित रक्षाबंधांचे भावनिक कार्यक्रम जरी आयोजित केले असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वातील वास्तव वेगळं असल्याचं सिद्ध झालं आहे. मतदार संघातील ज्या मोफत आरोग्य आणि उपचाराच्या मदतीच ते मार्केटिंग करतात, त्या वास्तविक सरकारी योजनांतर्गत मिळणाऱ्या मोफत सेवा आहेत. परंतु, मतदारांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्या स्वतःच्या व्यक्तिगत नावावर खपवून मतपेटी मजबूत करण्याचे त्यांचे जुने प्रयत्न आहेत.
कठुआ आणि उन्नाव सारख्या बलात्काराच्या घटनांनी भाजपची प्रतिमा आधीच मालिन झाली आहे. त्या सर्व घटना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुन्हा डोकं वर काढू शकतात. त्यात मुंबईमध्ये सुद्धा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राम कदमांच्या व्हिडिओ क्लिप सर्व महिलांपर्यंत पोहोचवली जाईल आणि भाजप विरोध रान उठवलं जाईल, यात काडीमात्र शंका नाही. आगामी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार राम कदमांनी स्वतःचे कितीही वारकरी प्रवचनं व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला तरी, त्याला ड्रामेबाजी असच प्रतिउत्तर दिल जाईल असं जाहिरात तज्ज्ञांशी बोलल्यावर लक्षात आलं.
सर्वच विरोधी पक्षांच्या प्रचारात आणि विशेषकरून निवडणुकीदरम्यान महिलांच्या मेळाव्यात राम कदमांच्या वक्तव्याची आठवण प्रत्येक महिलेला करून दिली जाईल आणि भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असं राजकीय तज्ज्ञांना वाटत आहे. त्यामुळे भाजपच्या इतर उमेदवारांनी राम कदमांसोबत फोटो जरी काढला तरी त्यांच्या अडचणी वाढू शकतात. काही टेलिव्हिजन वृत्त वाहिन्यांनी तर राम कदमांवर प्रवक्ते म्हणून बंदी घातली आहे. सध्या त्यांनी मतदारसंघातील लोकांना देव दर्शनाच गाजर दाखवून स्वतः सोबत बांधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परंतु मतदार संघात नक्की काय विकास केला तो अजून अदृश्यच आहे.
परंतु अर्थकारणाच्या जोरावर मतदारसंघातील मतदाराला साड्या-छत्र्या-यात्रा अशा आमिषात बांधून स्वतःचा राजकीय सेतू कसा बांधायचा हे त्यांना चांगलं अवगत झालं आहे. परंतु, मतदार सुद्धा सर्वकाही घेऊन आयत्यावेळी कसा घात करतो हे त्यांना या निवडणुकीत समजू शकत. राम कदमांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे त्यांच्यावर भाजपचे जुने निष्ठावान नेते आणि पदाधिकारी नाराज असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे काही दिवसांपासून त्यांना पक्षाच्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे निमंत्रण दिल जात नसल्याचे भाजपच्या गोटातून समजले आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?
- Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
- Zomato Share Price | मागील 1 वर्षात 271% परतावा देणारा झोमॅटो शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- Govt Employees Salary | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार आणि ईपीएफ मर्यादा वाढणार, महत्वाची अपडेट आली
- HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार
- IRCTC Share Price | IRCTC शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, झटपट मालामाल