24 April 2024 1:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

Mandakini Khadse in ED Office | मंदाकिनी खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात, पण ED कार्यालय बंद

Mandakini Khadse in ED Office

मुंबई, १९ ऑक्टोबर | पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई हायकोर्टाने मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्या ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. परंतु, ईडीचे कार्यालय बंद असल्याने त्यांनी परत (Mandakini Khadse in ED Office) जावे लागले. पण त्या पुन्हा येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्या तपास यंत्रणेत पूर्ण सहकार्य करतील, अशी माहिती मंदाकिनी खडसे यांचे वकील मोहन तळेकर यांनी दिली.

Mandakini Khadse in ED Office. Mandakini Khadse, wife of former minister Eknath Khadse, was directed by the Mumbai High Court to appear before the ED on Tuesday and Friday in connection with the Bhosari plot scam. However, as the ED’s office was closed, they had to return :

पुण्यातील भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले असता त्यांनी त्या विरोधात मुंबईच्या सत्र न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, सत्र न्यायालयाकडून मंदाकिनी खडसे यांना दिलासा मिळाला नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणाची सुनावणी करताना मंदाकिनी खडसेंना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. त्यांना तूर्तास अटक करू नये, असे निर्देष न्यायालयाने ईडीला दिले होता.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Mandakini Khadse in ED Office over questioning in Bhosari land scam case.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x