19 April 2024 8:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Stock Market LIVE | बीएसई सेन्सेक्समध्ये 84 अंकांची वाढ, पण नंतर निगेटिव्ह झोनमध्ये घसरला

Stock Market LIVE

मुंबई, २० ऑक्टोबर | जागतिक सकारात्मक संकेत मिळाल्याने निर्देशांकांत थोडी वाढ झाली. मुंबई शेअर बाजारातील बीएसई सेन्सेक्स 84 अंकांनी वाढून 61,800 वर (Stock Market LIVE) उघडला. तर 61,873 च्या उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर, निर्देशांक लवकरच निगेटिव्ह झोनमध्ये घसरला. बीएसई सेन्सेक्स 164 अंकांनी घसरून 61,553 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 18,458 चा उच्चांक गाठला, परंतु 64 अंकांनी खाली 18,355 वर आला.

Stock Market LIVE. The index rose slightly on positive global cues. The BSE Sensex rose by 84 points to 61,800. NSE’s Nifty rose 11 points to 18,419 :

व्यापक बाजारपेठेत IRCTC काल 10 टक्के लोअर सर्किटला म्हणजे 4,830 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरने काल इंट्राडे सौद्यांमध्ये 1 ट्रिलियन रुपयांचा टप्पा ओलांडला होता, तो 6,393 रुपयांवर म्हणजे आज पर्यंतचा सर्वाधिक उच्चांक होता.

OLA IPO’ची बाजारात उत्सुकता:
सॉफ्टबँकची गुंतवणूक असलेल्या भारतीय राइड-हेलिंग ब्रँड ओलाचे मुख्य वित्तीय अधिकारी स्वयंम सौरभ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पोरवाल कंपनीतून बाहेर पडणार (Ola IPO COO and CFO to Exit Company) असल्याचं वृत्त रॉयटर्सने प्रसिद्ध केलं आहे.

सदर वृत्त तेव्हा आलं जेव्हा ओला पुढच्या काही दिवसात IPO’द्वारे 1 अब्ज डॉलर्स जमा करण्याच्या योजनांवर काम करत आहे. या वृत्ताबाबत खात्री करण्यासाठी रॉयटर्सने कंपनीला ई-मेलद्वारे संपर्क देखील साधला परंतु त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

बहुचर्चित IPO साठी राईड-हेलिंग स्टार्टअपने सिटी ग्रुप इंक आणि कोटक महिंद्रा बँक लिमिटेड या बँकांची निवड केली. सदर IPO लौंचिंगमध्ये कोणतेही अडथळे येऊ नये म्हणून कंपनी विशेष काळजी घेताना दिसत आहे. कंपनीने सुमारे 1 अब्ज डॉलर्स उभारण्याचं लक्ष ठेवल्याचं ब्लूमबर्गने ऑगस्टमधील रिपोर्टमध्ये म्हटले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Stock Market LIVE BSE Sensex rose by 84 points to 61800 NSE Nifty rose 11 points.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x