29 March 2024 12:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

ड्रग्ज कनेक्शन चौकशीत अडकण्यापूर्वीच कंगना रानौत कुटुंबासहीत भाजपमध्ये दाखल होणार?

Kangana Ranaut, Asha Ranaut, Joining BJP, Marathi News ABP Maza

मुंबई, १२ सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे कंगनाने शिवसेनेवर टीका करणं सुरु केलं आहे तर दुसरीकडे भाजप महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला सतत घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, मुंबई पोलीस कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत चौकशी सुरू करणार आहेत.

आज (शनिवार) पासून कंगनाविरोधात ड्रग्ज कनेक्शनच्या संदर्भात चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांना शासकीय पत्र प्राप्त झाले असून त्यामध्ये तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. २०१६ मधील अध्ययन सुमनच्या मुलाखतीचा आधार घेऊन हा तपास केला जाणार आहे. मुलाखतीत कंगनाने कोकेन घेतल्याचं त्याने म्हटलं होतं.

शुक्रवारी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाच्या ड्रग्ज प्रकरणात प्रश्न उपस्थित केला. कंगनाचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमनच्या जुन्या मुलाखतीच्या आधारे हे प्रकरण हाताळलं जाणार आहे. अध्ययन सुमनने दावा केला होता की, कंगनाने ड्रग्स घेतले होते आणि त्याला देखील ड्रग्स घेण्यासाठी भाग पाडले होते.

दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत सध्या चांगलीच चर्चेत आहे. कोरोना काळातच सोशल मीडियावर #जस्टिसफॉरसुशांतची जागा #जस्टिसफॉरकंगना नं कधी घेतली हे अनेकांना कळलंदेखील नाही. शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या कंगनाचं पाली हिल इथलं घर वजा कार्यालय मुंबई महानगरपालिकेकडून उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर कंगनानं महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट टीका केली. त्यानंतर तिनं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही या वादात ओढून घेतलं. याच पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशात कंगना आणि तिचे कुटुंबीय भाजपमध्ये सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

यापूर्वी, कंगनाची आई आणि निवृत्त संस्कृत शिक्षिका आशा रानौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचे आभार मानले होते. ‘आम्ही सुरुवातीपासूनच काँग्रेस समर्थक आहोत हे माहीत असूनही त्यांनी आम्हाला मदत केली’ असं वक्तव्यही त्यांनी मीडियासमोर केलं. उल्लेखनीय म्हणजे, राजकारण काही कंगना आणि तिच्या कुटुंबासाठी नवीन नाही. कारण, कंगनाचे दिवंगत आजोबा सरजू राम मंडी जिल्ह्याच्या गोपाळपूर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते.

गुरुवारी हिमाचल भाजपाकडून मनालीपासून १५५ किलोमीटर दूर भांबला स्थित कंगनाच्या पैतृक निवासस्थानापर्यंत एकजुटतेचा संदेश देत एका मार्चचं आयोजन केलेलं दिसलं. भाजपचं हिमाचल युनिटनं याअगोदरच रानौत कुटुंबाच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचं म्हटलंय.

 

News English Summary: Actress Kangana Ranaut’s problems are likely to increase. On the one hand, Kangana has started criticizing Shiv Sena, while on the other hand, BJP is constantly trying to surround the Mahavikas Aghadi government in Maharashtra. Meanwhile, Mumbai Police is set to probe Kangana’s drug connection.

News English Title: Strong buzz about Kangana Ranaut and family joining saffron party Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x