13 December 2024 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
x

पूजाचा लॅपटॉप आणून द्या | भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांना नोटीस

BJP, Corporator Dhanraj Ghogre, Notice, Pooja Chavan suicide case

मुंबई, ०६ मार्च: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गूढ अजून उकलले नाही. पुणे पोलिसांनी आता भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धनराज घोगरे यांना नोटीस बजावली असून पूजाचा लॅपटॉप आणून देण्याची मागणी केली आहे. पुणे पोलिसांच्या या नोटीसीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना आपल्या वनमंत्री मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यातील संभाषणाच्या १२ ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहे. पूजाचा लॅपटॉप हा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धनराज घोगरे यांच्याकडे असल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी धनराज घोगरे यांनी नोटीस बजावली असून पूजाचा लॅपटॉप आणून देण्याची मागणी या नोटीसीतून केली आहे.

ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळीच भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचं समोर येत आहे. तसेच त्याचवेळी त्यांच्या फोटो आयडीचे फोटो काढून घेतल्याचं सांगितलं जात आहे. अखेर पुणे पोलिसांनी पहिल्यांदाच नोटीसीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आणखी वाद पेटण्याची चिन्ह आहे.

 

News English Summary: The mystery of Pooja Chavan suicide case has not been solved yet. Pune police have now issued a notice to Bharatiya Janata Party corporator Dhanraj Ghogre and demanded that Pooja’s laptop be brought. The Pune police’s notice has caused a stir.

News English Title: BJP corporator Dhanraj Ghogre got notice from Pooja Chavan suicide case news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x