20 April 2024 12:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

व्हिडिओ कुठला तेच माहित नसताना बदनामीकारक ट्विट | आहेत भाजपचे गुजराती पदाधिकारी

BJP spokesperson Suresh Nakhua

मुंबई, २१ एप्रिल: एका जिवंत असलेल्या कोरोना रुग्णाला कोरोना किटमध्ये बांधून अंत्यविधीसाठी स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आलं. स्मशानभूमीत आणल्यानंतर तो रुग्ण जिवंत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. हा गंभीर आणि संतापजनक प्रकार मुंबईत घडल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत सुरेश नाखुआ यांनी एक ट्वीट केलंय. “हे धक्कादायक आहे. एक जिवंत माणूस बीएमसीने स्मशानभूमीत नेला. मला वाटतं की #महावसुली आघाडी सरकारचं स्मशानभूमीतून काही महावसुलीचं टार्गेट असेल,” असं सुरेश नाखुआ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, वादग्रस्त व्हिडीओवरुन मुंबई महापालिकेनं खुलासा केलाय. मुंबई महापालिकेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सुरेश नाखुआ यांना फोन करतोय पण ते फोन घेत नाहीत. आम्ही त्यांना ट्वीट केलेल्या व्हिडीओबद्दल विचारतो आहोत, मात्र ते प्रतिसाद देत नाहीत. आम्ही आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत आहोत, अशी माहिती चहल यांनी दिलीय.

सुरेश नाखुआ यांनी हा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या ट्विटर हँडलवरुन त्याला उत्तर देण्यात आलंय. “सर, आपल्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणानुसार आम्ही तुम्हाला विनंती केली की, या व्हिडीओचं मूळ आणि सत्यता तपासून पाहा. मात्र, तुम्हालाही या व्हिडीओचं मूळ स्थान आणि सत्यतेबद्दल खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही तुमच्याकडून माहितीची वाट पाहत आहोत. त्यानंतर याबाबत पुढील कारवाईचा विचार केला जाईल” असं ट्वीट मुंबई महापालिकेनं केलं आहे.

प्रथम BMC, महावसुली असे शब्दप्रयोग करत थेट दावा करणाऱ्या सुरेश नाखुआ यांनी मुंबई महानगरपालिका गुन्हा दाखल करणार म्हटल्यावर सावध प्रतिकिया दिली आहे. मुंबई महापालिकेच्या या ट्वीटला नाखुआ यांनी उत्तर दिलंय. “कृपया दिशाभूल करु नका. आपलं दूरध्वनीवर संभाषण झालं नाही. तर ते फक्त व्हॉट्सअपवरील संदेशाची देवाणघेवाण होती. मला या घटनेत्या स्थानाबाबत माहीत नाही. मी त्याबाबत माहिती घेत असल्याचं तुम्हाला सांगितलं. लोकांची दिशाभूल करु नये, अशी विनंती”, असं नाखुआ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. धक्कादायक म्हणजे तपासल्यानंतर ते मुंबई भाजपचे प्रवक्ते असल्याचं समजतंय. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर तशी माहिती दिली आहे. त्यांचं ट्विटर अकाऊंटही व्हेरिफाईड आहे.

 

News English Summary: A living corona patient was tied up in a corona kit and taken to the cemetery for burial. The shocking fact that the patient was alive after being brought to the cemetery. This serious and annoying type is said to have happened in Mumbai. Suresh Nakhua tweeted about this. “It’s shocking. A living man was taken to the cemetery by BMC. I think the Mahavasuli Aghadi government will be the target of some Mahavasuli from the cemetery, ”Suresh Nakhua had said in his tweet.

News English Title: BJP spokesperson Suresh Nakhua shared video of covid patient without having any information regarding location news updates.

 

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x