अंबानींच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळण्यासाठी बड्या मंत्र्याकडून सुपारी - अविनाश जाधव
ठाणे, १७ मार्च: सचिन वाझे प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी सायंकाळी जप्त केलेली मर्सिडीज कार धुळे पासिंगची असून ती मनीषा महेंद्र भावसार यांच्या नावावर असल्याचे दिसते आहे. दरम्यान, महेंद्र भावसार यांचे चिरंजीव सारांश भावसार यांनी ती विकत घेतली होती आणि फेब्रुवारी महिन्यात त्यांनी ती आॅनलाइन पोर्टलच्या माध्यमातून विकली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान याच विषयात आता राजकीय नेत्यांचे धक्कादायक दावे देखील समोर येऊ लागले आहेत. तसाच एक धक्कादायक दावा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात मनसेने उडी घेतली आहे. अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळण्यासाठी बड्या मंत्र्याने सुपारी घेऊन रचलेला हा कट आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसईत केला.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक असलेली गाडी ठेवली, ही जीवाला धोका म्हणून, की अंबानी यांच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून, याचा तपास होणे गरजेचे आहे. या सर्व प्रकरणात खूप मोठ्या मंत्र्याचा हात आहे. हा हेलिपॅडला परवानगी मिळवण्यासाठी सुपारी घेऊन रचलेला कट आहे, असा थेट आरोपच अविनाश जाधव यांनी केला.
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्या गाडीत पैसे मोजण्याचे मशीन सापडणं, हे फार मोठं गंभीर प्रकरण असल्याचंही अविनाश जाधव म्हणाले. हे सर्व प्रकरण पोलिसांच्या अंतर्गत वादातून बाहेर आले आहे. सध्या या प्रकरणाचा NIA व्यवस्थित तपास करत आहे. अवघ्या 2 ते 3 दिवसात मोठी पत्रकार परिषद होणार असून यात राज्याच्या राजकारणातील मोठा स्फोट होणार असल्याचा दावाही अविनाश जाधव यांनी केला आहे.
News English Summary: MNS has jumped into the Scorpio case filled with explosives found in front of industrialist Mukesh Ambani’s house. Avinash Jadhav, Thane-Palghar district president of Maharashtra Navnirman Sena, made a serious allegation that the plot was hatched by a senior minister to get permission for the helipad at Ambani’s house.
News English Title: Plan was made by a senior minister to get permission for the helipad at Ambani’s house news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News