12 December 2024 12:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Pornography Case | पत्नी शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राच्या विरोधात साक्षीदार | चार्जशीट दाखल

Pornography case Raj Kundra

मुंबई, १६ सप्टेंबर | पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. या प्रकरणात शिल्पा शेट्टी साक्षीदार आहे. तसेच पोर्नोग्राफीबाबत वापरल्या जाणाऱ्या हॉटशॉट्स अ‍ॅपचा सूत्रधार राज कुंद्रा हाच असल्याचे आढळून आले आहे. यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान या प्रकरणावर आज (16 सप्टेंबर) सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Pornography Case, पत्नी शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राच्या विरोधात साक्षीदार, चार्जशीट दाखल – Pornography case wife Shilpa Shetty witness against Raj Kundra :

शिल्पा शेट्टी साक्षीदार:
पोर्नोग्राफी प्रकरणात कालच (15 सप्टेंबर) राज कुंद्रा आणि इतर १३ आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी मुख्य महानगर दंडाधिकारी, ३७ वे न्यायालय, किल्ला कोर्ट, मुंबई यांच्या न्यायालयात एकूण ४९९६ पानांची चार्जशीट दाखल केली आहे. यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी, शर्लिन चोप्रा आणि इतर ४३ जणांचे जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवले आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रा विरोधात पोर्नोग्राफी प्रकरणात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात शिल्पा शेट्टीचे साक्षीदार म्हणून नाव आहे. यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत.

ब्रेक देण्याच्या बहाण्याने अश्लिल चित्रफिती:
फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास इच्छुक तरुणींना ब्रेक देण्याच्या बहाण्याने अश्लिल चित्रफिती बनवून त्या प्रसारीत करणाऱ्या पॉर्न फिल्म प्रोडक्शन कंपनीबाबत माहिती प्राप्त झाली. यामुळे ०४ फेब्रुवारी २०२१ रोजी मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखा यांनी पर्दापाश करून मालवणी पोलीस ठाणे गु.र.क्र. १०३ / २०२१ गुन्हा नोंद करून ५ आरोपींना अटक केले होते. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान एकूण ९ आरोपींना अटक करून त्यांच्याविरुध्द ०१ एप्रिल २०२१ रोजी न्यायालयात एकूण ३५२९ पानांची चार्जशीट दाखल केली. तसेच, कलम १७३ (८) फौ.दं.प्र.सं. अन्वये तपास सुरु होता.

एकूण ४९९६ पानांचे दोषारोपपत्र:
या प्रकरणात अटक आरोपी रिपू सुदन कुंद्रा उर्फ राज कुंद्रा व रायन जॉन थॉर्प तसेच सिंगापूर येथे राहणारा वॉन्टेड आरोपी यश ठाकूर उर्फ अरविंदकुमार श्रीवास्तव व लंडन येथे राहणारा परदिप बक्शी यांच्याविरुध्द अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, ३७ वे न्यायालय, किल्ला कोर्ट, मुंबई यांच्या न्यायालयात १५ सप्टेंबर २०२१ रोजी एकूण १४६७ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारे नमूद गुन्ह्यात एकूण १३ आरोपींविरुध्द एकूण ४९९६ पानांचे चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Pornography case wife Shilpa Shetty witness against Raj Kundra.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x