20 April 2024 6:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

अमली पदार्थाच्या खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याच्या प्रकरणात थेट सहभाग | तरी भाजपकडून परमबीर यांची ठाणे पोलिस आयुक्तपदी नियुक्ती - लेटर बॉम्ब

Senior Police inspector R Ghadge

मुंबई, २७ एप्रिल | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पाेलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. परमबीरसिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे पत्रच घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लिहिले आहे. परमबीरसिंग १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८ अशी सलग तीन वर्षे ठाणे शहराचे पोलिस आयुक्त होते. त्या काळात घाडगे हेही तिथे पोलिस निरीक्षक होते.

घाडगे यांनी पत्रात लिहिले आहे की, परमबीरसिंग यांनी पदाचा, अधिकारांचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला आहे. दोन पोलिस कॉन्स्टेबल २० वर्षांपासून त्यांच्यासोबत खासगी व्यवहार पाहण्यासाठी व बदल्यांमधील भ्रष्टाचाराच्या रकमेची देवाणघेवाण करण्यासाठी आहेत. परमबीर यांनी बेनामी संपत्ती कोठे व कुणाच्या नावावर खरेदी केली आहे याबाबत मला संपूर्ण माहिती आहे. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसऱ्याच्या नावावर २१ एकर जमीन खरेदी केलेली आहे. त्यांच्या एका मित्रामार्फत १० ते १५ लाख रुपये घेऊन रिव्हॉल्व्हर लायसन्स दिले जात होते. त्यांच्यामार्फत बिल्डरची कामे कोट्यवधी रुपयांची सेटलमेंट करून दिली जात. जो अधिकारी त्यांचे ऐकत नव्हता त्याची नियंत्रण कक्षात बदली करण्यात येत होती. परमबीरसिंग यांनी माझ्याविरुद्धसुद्धा पाच खोटे गुन्हे नोंदवले होते. बदल्यांचे पैसे जमा करण्यासाठी राजू अय्यर नावाचा एजंट ठेवला होता. पोलिस निरीक्षकांच्या बदल्यासाठी ५० लाख ते एक कोटी रुपये घेतले जात होते.

२०१५, २०१६ मध्येही घाडगे यांनी केल्या होत्या तक्रारी;
सलील चतुर्वेदी यांना अमली पदार्थाच्या खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याच्या प्रकरणात परमबीरसिंग आणि केंजळे यांचा थेट सहभाग असल्याचे सिद्ध झाले असतानाही फक्त पोलिस निरीक्षकाविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले. मात्र परमबीरसिंग आयपीएस दर्जाचे अधिकारी असल्याने त्यांना वाचवण्यात आले, असाही आरोप या पत्रात करण्यात आला आहे. २०१४ ते २०१९ मध्ये भाजपचे सरकार सत्तेवर होते तेव्हा परमबीर यांच्यासारख्या गुन्हेगारास शिक्षा करण्याऐवजी ठाणे पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली, असा उल्लेख घाडगेंनी पत्रात केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी २१ सप्टेंबर २०१५ व मार्च २०१६ रोजी परमबीरसिंगांविरुद्ध घाडगे यांनी तक्रारी केल्या आहेत.

अॅन्टालिया रोडवर त्यांनी ६३ कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे. परमबीर यांची पत्नी सविता यांच्या नावाने खेतान अॅन्ड कंपनी ही उघडली असून तिचे कार्यालय इंडिया बुल इमारत, ६ वा मजला, लोअर परेल, मुंबई येथे आहे. त्या कंपनीच्या संचालक आहेत. या कंपनीत पाच कोटींची गुंतवणूक आहे. माझ्याकडे असलेल्या तपासातील गुन्ह्यातील आरोपींची नावे काढून टाकण्याचे आदेश परमबीर यांनी दिले होते. ते न ऐकल्याने माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले. या प्रकरणातील आरोपींची नावे काढून टाकण्यात आली. त्याबदल्यात त्यांनी २०० कोटींचा भ्रष्टाचार केला.

भीमराव घाडगे हे कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यावेळी परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. अनेक श्रीमंत गुन्हेगारांना सोडून देण्यासाठी त्यांनी दबाव आणला होता. तसे न केल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली, असे घाडगे यांचे म्हणणे आहे. सध्या ते अकोला नियंत्रण कक्षात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

दिवाळी भेट म्हणून त्यांनी डीसीपीकडून प्रत्येकी ४० तोळे सोन्याची बिस्किटे, सहायक पोलिस निरीक्षकाकडून २० ते ३० तोळ्यांची सोन्याची बिस्किटे व पोलिस निरीक्षकाकडून ३० ते ४० तोळे सोन्याची बिस्किटे घेतली आहेत. भ्रष्टाचारातून मिळवलेले पैसे त्यांनी बिल्डर बोमन इराणी आणि रुतमजी यांच्याकडे गुंतवले आहेत. कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दररोज सुमारे २५० ते ३०० डंपरवजा ट्रक वाहतूक होत होती. त्यामध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती. अवैध वाळू व्यावसायिकावर कायदेशीर कारवाई केल्यास त्या पालिस अधिकाऱ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून त्यास अडकवले जात होते. त्यामध्ये मलाही खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. याबाबत मी १७ मार्च २०१६ रोजी तक्रार दिलेली आहे. परमबीर यांनी त्यांचा मुलगा रोहन याच्या नावाने सिंगापूर येथे व्यवसाय सुरू केला असून त्यामध्ये दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

 

News English Summary: Although it was proved that Parambirsingh and Kenjle were directly involved in the case of Salil Chaturvedi’s involvement in a drug case, only cases were registered against the police inspector. However, as Parambir Singh was an IPS officer, he was rescued, the letter said. When the BJP government was in power from 2014 to 2019, instead of punishing criminals like Parambir, he was appointed as Thane Police Commissioner, Ghadge has mentioned in the letter. It is noteworthy that Ghadge had earlier lodged complaints against Parambir Singh on September 21, 2015 and March 2016.

News English Title: Senior inspector R Ghadge made serious corruption allegations on Parambir Singh news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x