AXIS बँक | यापूर्वीच ईडीकडे तक्रार आणि न्यायालयात याचिका | म्हणून त्या एकेरी भाषेत संतापल्या?
मुंबई, २३ मार्च: महाविकासआघाडीचे पक्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना केलेल्या घोटाळ्यावरून फडणवीसांना टार्गेट करत आहेत.ॲक्सिस बॅंकेत पोलीसांचे अकाऊंट ट्रान्सफर करण्यावरून भाई जगताप आणि फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात वॅार पाहायला मिळालं. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत ‘राजीनामा मागणाऱ्या फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं’ असा थेट सवाल विचारला.
विशेष म्हणजे २०१४ पूर्वी ऍक्सिस बँकेच्या नागपूर शाखेत अमृता फडणवीस या असोसिएट व्हीपी पदावर होत्या. पती देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री होताच अमृता फडणवीस ‘अॅक्सिस बँके’त उच्च पदावर कार्यरत झाल्या (की घेतल्या गेल्या?) म्हणजे थेट ऍक्सिस बँक पश्चिम भारताच्या व्हीपी आणि कॉर्पोरेट हेड पदावर विराजमान झाल्या. बँकिंग क्षेत्रातील प्रगतीचं हे दुर्मिळ उदाहरण असावं. ऍक्सिस बँकेने त्यांना ते कशा साठी दिलं असावं हे समजण्यासाठी तज्ज्ञाची देखील गरज नाही. मात्र याच विषयावरून ED कडे लेखी तक्रार आणि न्यायालयात याचीका दाखल असताना अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांना दिलेलं एकेरी भाषेत प्रतिउत्तर सुद्धा त्यांच्या संतापाचे कारण सांगून जातंय.
कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध नागपूरमधील महिती अधिकार कार्यकर्ते मोहनीश जबलपूरे यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) लेखी तक्रार ऑगस्ट २०१९ मध्ये नोंदवली होती. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन नागपूरमधील एका खासगी बँकेला अवैध पद्धतींनी फायदा करुन दिल्याची तक्रार जबलपूरे यांनी ईडीकडे केली होती. या खाजगी बँकेत फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या एका वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत त्यामुळे या बँकेचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांनी सूट दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या प्रकरणात ईडी व सीबीआयने फडणवीस यांची चौकशी करावी अशी मागणी देखील या तक्रारीमध्ये जबलपूरे यांनी केली होती.
A #Nagpur-based RTI activist has complained to the #EnforcementDirectorate (#ED), seeking a probe against Chief Minister #DevendraFadnavis for allegedly using his position to help improve the business of a private bank where his wife holds a senior position on August 27. pic.twitter.com/9C6jAemGZI
— IANS Tweets (@ians_india) August 27, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर करत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय बँकेमधून ऍक्सिस बॅंकेत वळवल्याचा आरोप जबलपूरे यांनी केला होता. फडणवीस यांची पत्नी ऍक्सिस बॅंकमध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याने बँकेला झुकते माप देत राष्ट्रीय बँकांना तोटा होणारा हा निर्णय घेण्यात आल्याचे जबलपूरे यांनी म्हटले होते. या प्रकरणामध्ये स्टेट बँकेने अधिकृत अहवाल देऊन अशा पद्धतीने किती खाती या खासगी बँकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत हे ही जाहीर करण्यात यावे अशी मागणी जबलपूरे यांनी केली होती. याच प्रकरणासंदर्भात जबलपूरे यांनी ७ ऑगस्ट २०१९ रोजी एक याचिका मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर करत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून AXIS बॅंकेत वळवल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात फडणवीस आणि राज्य सरकारवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडवणीस या AXIS बॅंकमध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याने बँकेला झुकते माप देत राष्ट्रीय बँकांना तोटा होणारा हा निर्णय घेण्यात आल्याचे या याचिकाकार्त्याने आरोप केले होते.
याचिकेत राज्य सरकारने ११ मे २०१७ रोजी एक परिपत्रक काढून राज्यातील पोलिसांची बँक खाती तसेच संजय गांधी निराधार आवास योजनेच्या लाभार्थ्यांची खाती खासगी बँकेमध्ये उघडण्यास सांगितल्याचे म्हटले होते. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत AXIS बॅंकेला मुद्दाम झुकते माप दिले. या निर्णयामुळे राष्ट्रीय बँकांना फटका बसला असून त्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
सरकारने जारी केलेल्या या परिपत्रकानुसार घेण्यात आलेले सर्व निर्णय रद्द करावेत. यासंदर्भात सरकारने घेतलेले सर्व निर्णय, परवाणग्या, करार रद्द करावेत अशी मागणी जबलपुरे यांनी कोर्टाकडे केली होती. तसेच हा निर्णय घेताना AXIS बॅंक आणि राज्य सरकारमध्ये काय करार झाला आणि या निर्णयानंतर जेवढी पैशांची देवाणघेवाण झाली या सर्वांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही जबलपुरे यांनी कोर्टाकडे केली होती.
News English Summary: A Nagpur based RTI activist has complained to the Enforcement Directorate, seeking a probe against former Chief Minister Devendra Fadnavis for allegedly using his position to help improve the business of a private bank where his wife holds a senior position on August 2.
News English Title: AXIS bank issue raised again after tweeter war between Bhai Jagtap and Amruta Fadnavis news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट