13 December 2024 7:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

प्रायव्हेट कंपनीत नोकरी करताय? | मग 1 एप्रिलपासून पगाराची नवीन सिस्टीम

Code on Wages Bill, private sectors, Salary slip

मुंबई, १६ मार्च: येत्या 1 एप्रिल 2021 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षानंतर पगारदार वर्गाला मोठ्या बदलांचा सामना करावा लागणार आहे. कारण आता सर्व पगारदार वर्गासाठी सरकारकडून ‘पगार व्यवस्था’ आणली जात आहे. जर ही व्यवस्था लागू झाल्यास तुमच्या खात्यात पगाराची रक्कम कमी येऊ शकते. याचा परिणाम पगारदारांवर होणार आहे.

मागील वर्षी संसदेत वेतन नियमावली विधेयक ( Code on Wages Bill ) मंजूर झाले असून, आता हे विधेयक 1 एप्रिलपासून लागू होईल, अशी शक्यता आहे. हे लागू झाल्यास सर्व प्रकारच्या कपात झाल्यानंतर हातात येणारा पगार कमी होणार आहे. या नव्या विधेयकानुसार, कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार (CTC) 50 टक्के रक्कम बेसिक आणि 50 टक्के भत्ता अशा रूपात द्यावी लागणार आहे.

या कर्मचाऱ्यांवर होणार नाही परिणाम:
ज्या कर्मचाऱ्यांच्या एकूण पगाराची 50 टक्के रक्कम आधीच बेसिक आहे. त्यांच्यावर या नव्या नियमांचा काहीही परिणाम होणार नाही. ज्यांची बेसिक सॅलरी एकूण रकमेच्या 30 ते 40 टक्के आहे, त्यांच्या हातात येणाऱ्या पगारात मात्र कपात होईल.

तुमच्या हातात किती येणार पगार?
जर कंपनीने तुमच्या पगारातील 5 टक्के ग्रॅच्युइटीची रक्कम कापली, तर 5 हजार रुपयांमधून 250 रुपये ग्रॅच्युइटी म्हणून कपात होईल. म्हणजेच 5,000 बेसिक पगारातून नोकरदाराच्या हातात 4150 रुपये शिल्लक राहतील. अशावेळी 10 हजार रुपये पगारवाल्या नोकरदाराच्या हातात 4150 (बेसिक) + 5000 (इतर भत्ते) = 9150 रुपये येतील.

 

News English Summary: The salaried class will have to face major changes after the financial year starting from April 1, 2021. Because now the government is introducing a ‘salary system’ for all salaried classes. If this system is implemented, the amount of salary in your account may be reduced. This is going to affect the salaried.

News English Title: Code on Wages Bill will impact on salary slip of private sectors employees news updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x