11 December 2024 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

रेल्वेची ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटे रद्द, तिकिटांचा पूर्ण परतावा मिळणार

Lockdown, Corona Crisis, Indian Railway

नवी दिल्ली, १४ मे: भारतीय रेल्वे प्रशासनाने ३० जूनपर्यंत रेल्वेच्या तिकिटांचे बुकींग करणाऱ्या प्रवाशांची तिकिटे रद्द करण्याची घोषणा केली आहे. ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटे ऑटोमॅटीकपद्धतीने रद्द होणार असून या तिकिटांचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार असल्याचे मंगळवारी रेल्वेने जाहीर केलं. रद्द करण्यात आलेल्या तिकिटांमध्ये मेल, एक्सप्रेस तसेच लोकल उपनगरीय रेल्वे तिकिटांचा समावेश आहे.

३० जूनपर्यंतची रेल्वे तिकिटे रद्द करण्यात आली असली तरी स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या श्रमीक विशेष ट्रेनची सेवा सुरुच राहणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

रेल्वे २२ मेपासून मेल, एक्स्प्रेस आणि शताब्दी गाड्या सुरू करण्याच्या विचारात आहे. सध्या देशभरात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यासाठी रेल्वेनं श्रमिक विशेष गाड्यांसह राजधानी विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. यानुसार शताब्दी विशेष आणि इंटरसिटी विशेष गाड्या चालवल्या जाऊ शकतात. यामुळे मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळू शकेल. या गाड्यांमध्ये एसी फर्स्ट क्लासची २० तिकिटं वेटिंगवर असतील. तर एसी सेकंड क्लासमध्ये ५० आणि एसी थर्ड क्लासमध्ये १०० तिकिटं वेटिंगवर असतील. स्लीपर क्लासमध्ये २०० तिकिटं वेटिंगवर असतील.

नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ मेनंतर देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होणार असल्याचं आपल्या संबोधनातून सांगितलं होतं. या लॉकडाऊनमध्ये काही नवीन नियमही असतील. त्याबद्दल लवकरच केंद्राकडून दिशानिर्देशही जाहीर केले जाणार आहेत. परंतु, आता रेल्वेनं थेट ३० जूनपर्यंत प्रवासी तिकिटांचं बुकिंग रद्द केल्यानं लॉकडाऊन नेमकं कधीपर्यंत सुरू राहणार असा प्रश्न नागरिकांना पडलाय.

 

News English Summary: The Indian Railways has announced the cancellation of tickets for passengers who have booked train tickets till June 30. All tickets till June 30 will be canceled automatically and passengers will get full refund of these tickets, the Railways announced on Tuesday.

News English Title: Corona virus Lockdown Tickets For Regular Trains For Travel Till June 30 Cancelled News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x