11 December 2024 5:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL
x

सध्याची बेरोजगारीची समस्या नोटबंदीच्या चुकीच्या निर्णयामुळे उद्भवली आहे - डॉ. मनमोहन सिंह

Demonetisation, Unemployment, former PM Dr Manmohan Singh

नवी दिल्ली, ०२ मार्च: माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांनी मंगळवारी केंद्रातील मोदी सरकारला बेरोजगारीच्या मुद्यावर चांगलीच चपराक दिलीय. २०१६ साली मोदी सरकारनं कोणत्याही विचार-विनिमयाशिवाय घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात बरोजगारी सर्वोच्च स्तरावर आहे, असं डॉ. मनमोहन सिंह यांनी म्हटलंय.

देशातील राज्यांशी नियमित रुपात कोणताही विचार-विनिमय न करता निर्णय घेण्यावरूनही मनमोहन सिंह यांनी केंद्रातील मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. केरळमध्ये राजीव गांधी डेव्हलपमेंट स्टडिजच्या व्हर्च्युअल संमेलनाचं उद्घाटनं करताना डॉ. मनमोहन सिंग यांनी यावर भाष्य केलं. “सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या तात्पुरत्या उपाययोजनांनी पतपुरवठा समस्या लपवता येणार नाही. या संकटाचा परिणाम लघु आणि मध्यम क्षेत्रावर होऊ शकतो,” असं ते म्हणाले.

देशात बेरोजगारी अधिक आहे आणि असंघटीत क्षेत्र ढासळलं आहे. हे संकट २०१६ मध्ये कोणत्याही विचारांशिवाय घेण्यात आलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे उद्भवलं आहे,” असंही त्यांनी नमूद केलं. करोना संकटकाळातच महागाई आणि बेरोजगारी या मुद्यांवरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारला घेरलंय. अनेक ठिकाणी विरोधी पक्षांकडून महागाईच्या मुद्यावरून आंदोलनं केली जात आहेत. अशा वेळी डॉ. मनमोहन सिंह यांची टिप्पणी मोदी सरकारला आणखीन अडचणीत आणू शकते.

 

News English Summary: Former Prime Minister and senior economist Dr. On Tuesday, Manmohan Singh slammed the Modi government at the Center on the issue of unemployment. Unemployment is at the highest level in the country due to the decision taken by the Modi government in 2016 without any deliberation. Manmohan Singh has said.

News English Title: Demonetisation is main reason behind current unemployment issue in the nation said former PM Dr Manmohan Singh news updates.

हॅशटॅग्स

#Manmohan Singh(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x