19 March 2024 12:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेटने शेअरवर परिणाम, शेअरची प्राईस खूप घसरणार? IPO GMP | स्वस्त IPO शेअरने लॉटरी लागली! एकदिवसात 101 टक्के परतावा मिळाला, गुंतवणूकदार मालामाल IRFC Vs RVNL Share Price | रेल्वे सेवा संबंधित शेअर्स खरेदी करावे? 1 वर्षात मल्टिबॅगर परतावा दिला, पण पुढे काय होणार? Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, सकारात्मक अपडेटने स्टॉक तेजीत Mutual Fund SIP | पगारदारांनो! महिना 3000 रुपयांची SIP बचत देईल कोटी मध्ये परतावा, रक्कम जाणून घ्या Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिस FD विरुद्ध बँक FD पैकी अधिक व्याज कोणत्या योजनेत मिळेल तपासून घ्या
x

EPFO Alert | 1 जूनपूर्वीच करा हे काम, अन्यथा तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत

EPFO

मुंबई, २९ मे | नोकरी करणार्‍यांसाठी मोठी बातमी आहे. EPFO च्या वतीने भविष्य निर्वाह निधी खातेधारकांच्या नियमात बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, आता कंपनीनं प्रत्येक कर्मचार्‍याच्या खात्यास 1 जूनपासून आधार कार्डाशी लिंक करणे आवश्यक आहे. जर तसे झाले नाही, तर खात्यात कंपनीचे योगदान देखील थांबेल. अशा परिस्थितीत आपण ताबडतोब आपले खाते आधारशी लिंक करून घ्यावे.

तसे न केल्यास कर्मचाऱ्याचे योगदान खात्यात जमा होणार नाही
EPFO ने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये कंपनीला विशेष जबाबदारी देण्यात आलीय. तसेच कर्मचाऱ्यांचे अकाऊंट आधार कार्डशी जोडण्यास सांगितलेय. अधिसूचनेनुसार, तसे न केल्यास कर्मचाऱ्याचे योगदान खात्यात जमा होणार नाही, ज्याचा आपल्यावर थेट परिणाम होईल. अशा परिस्थितीत नियम काय आहे आणि त्याचा आपल्यावर कसा प्रभाव पडू शकतो आणि आपल्याला काय करावे लागेल हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे.

नवीन नियम काय सांगतो?
EPFO ने सामाजिक सुरक्षा कोड 2020 अंतर्गत हा निर्णय घेतलाय. या नियमानुसार, ज्या खातेदारांचे खाते 1 जूननंतर आधारशी लिंक केले जाणार नाही, अशा खातेदारांना इलेक्ट्रॉनिक चालान कम रिटर्न भरता येणार नाही. त्यामुळे खातेधारकांना पीएफ खात्यात कंपनीने दिलेलं योगदान मिळविणे कठीण जाईल. कर्मचारी फक्त त्यांचे स्वत: चे योगदान खात्यात दिसेल.

UAN ला आधार जोडणे आवश्यक:
पीएफ खात्यास आधारशी जोडणे बंधनकारक करण्याबरोबरच UAN बाबतही निर्णय घेण्यात आलाय. या नियमांतर्गत सर्व खातेधारकांचे UAN देखील आधारशी जोडणे आवश्यक आहे. ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सर्वप्रथम आपले खाते आधार कार्डाशी लिंक करा आणि आधार यूएएनलाही पडताळून पाहा, म्हणजे खात्यात कंपनीने जमा केलेल्या रकमेमध्ये तुम्हाला अडचण उद्भवणार नाही.

UAN आधारशी कसे जोडावे?
आपणास EPFO सेवेमध्ये काही अडचण येऊ नये, असे देखील आपणास पाहिजे असल्यास आपण आपला आधार UAN शी जोडावा. आपण आपल्या पीएफ खात्यास काही मिनिटांत सहजपणे आधारशी लिंक करू शकता. यासाठी प्रथम अधिकृत वेबसाईटवर जा. यानंतर ऑनलाईन सेवेत E केवायसीमार्फत तुमचे आधार कार्ड UAN शी लिंक करा. आपण ओटीपीमार्फत ही प्रक्रिया पूर्ण करण्यास सक्षम असाल.

उद्योग जगतातील 80% कंपन्यांकडून 10%पर्यंत पगारवाढीचे संकेत:
दुसऱ्या लाटेचा फटका असला तरी तो मागील वर्षाएवढा मोठा नाही. शिवाय कर्मचारी टिकवण्याचे आव्हान असल्याने जवळपास ८० टक्के उद्योगांनी पगारवाढीचा निर्णय घेतला आहे. आयटी, फार्मा, ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिकमध्ये घसघशीत पगारवाढीचे संकेत मिळताहेत. कंपनीच्या, उद्योगांच्या वर्षभराच्या कामगिरीवर कर्मचाऱ्यांची पगारवाढ अवलंबून असते. यंदा फेब्रुवारीत एकूण क्षमतेच्या ८५% तर मार्चमध्ये ८३% उत्पादन झाले. एप्रिल २०२० नंतर प्रथमच डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या तीन महिन्यांच्या मंथ ऑन मंथ कामगिरीत सुधारणा दिसली. यामुळे उद्योगांनी पगारवाढीचा निर्णय घेतल्याचे उद्योजकांची संघटना उद्योग भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवी वैद्य यांनी सांगितले.

 

News English Summary: Great news for job seekers. EPFO has made changes in the rules of provident fund account holders. According to the new rules, the company is now required to link each employee’s account with the Aadhaar card from June 1. If that doesn’t happen, the company’s contribution to the account will also stop. In that case, you should immediately link your account to Aadhaar.

News English Title: EFFO New Rule for employer every account should be linked with Aadhar Card news updates.

हॅशटॅग्स

#EPFO(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x