19 March 2024 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | अवघ्या 21 रुपयाचा शेअर वेळीच खरेदी करा, खरेदीनंतर संयम मोठा परतावा देईल RailTel Share Price | कमाईची संधी! अवघ्या 3 दिवसांत 20% परतावा आणि 7 दिवसात कंपनीला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाले Zomato Share Price | पैशाने पैसा वाढवा! झोमॅटो शेअर 200 टक्केपर्यंत परतावा देईल, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Paytm Share Price | सुवर्ण संधी! 63 टक्क्यांनी स्वस्त झालेला पेटीएम शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राइस जाणून घ्या DroneAcharya Share Price | अल्पावधीत मजबूत परतावा देतोय हा शेअर, वेळीच खरेदी करा, ऑर्डरबुक मजबूत झाली Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Reliance Infra Share Price | मार्ग श्रीमंतीचा! रिलायन्स इन्फ्रा शेअरने 2 दिवसात 20 टक्के परतावा दिला, खरेदी करावा
x

EPF वरील 8.5% व्याजाची रक्कम | डिसेंबर अखेरपर्यंत तुमच्या खात्यात जमा होऊ शकते

EPFO interest, Deposited, Employees bank account

नवी दिल्ली, १४ डिसेंबर: ईपीएफओच्या (EPFO) तब्बल सहा कोटी ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना डिसेंबर 2020 च्या अखेरपर्यंतच्या आर्थिक वर्ष 2019-20 साठी सुमारे सहा कोटी भागधारकांच्या कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये (Employees’ Provident Fund Organization) 8.5 टक्के व्याज (Total Interest) जमा करण्याची शक्यता आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये, ईपीएफओने दोन हप्त्यांमध्ये हे व्याज देण्याचे ठरविले होते. पहिल्या हप्त्यात 8.15 टक्के आणि दुसर्‍या हप्त्यात 0.35 टक्के व्याज दिले जाणार होते. मात्र प्रसार माध्यमांच्या हाती आलेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने एकत्रच व्याज देण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे पाठविला आहे. अर्थ मंत्रालय काही दिवसांत हा प्रस्ताव मंजूर करू शकेल. अशा प्रकारे, या महिन्याभरात संपूर्ण व्याज दिले जाऊ शकते.

सविस्तर वृत्तानुसार, वित्त मंत्रालयाने गेल्या आर्थिक वर्षातील व्याजदराबाबत काही स्पष्टीकरण मागितले होते ज्याचे निराकरण झाले आहे. यावर्षी मार्चमध्ये, ईपीएफओबाबत निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) 2019-20 साठी ईपीएफवर 8.5% व्याज मंजूर केले. या संस्थेचे अध्यक्ष कामगार मंत्री संतोष गंगवार आहेत. सप्टेंबरमध्ये सीबीटीच्या आभासी बैठकीत ईपीएफओने गेल्या आर्थिक वर्षात 8.5 टक्के व्याज देण्याच्या आश्वासनाची पुष्टी केली होती. मात्र सीबीटीने साथीच्या पार्श्वभूमीवर दोन हप्त्यांमध्ये व्याज देण्याचे ठरविले.

केंद्रीय वित्त मंत्रालयाने मागील आर्थिक वर्षातील व्याजदराबाबत काही स्पष्टीकरण मागितले होते ज्याचे निराकरण झाले आहे. यावर्षी मार्चमध्ये, ईपीएफओबाबत निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) 2019-20 साठी ईपीएफवर 8.5% व्याज मंजूर केले. या संस्थेचे अध्यक्ष कामगार मंत्री संतोष गंगवार आहेत. सप्टेंबरमध्ये सीबीटीच्या आभासी बैठकीत ईपीएफओने गेल्या आर्थिक वर्षात 8.5 टक्के व्याज देण्याच्या आश्वासनाची पुष्टी केली होती. परंतु सीबीटीने साथीच्या पार्श्वभूमीवर दोन हप्त्यांमध्ये व्याज देण्याचे ठरविले. सूत्रांच्या माहितीनुसार, शेअर बाजाराची स्थिती आता चांगली आहे, त्यामुळे एकाच वेळी 8.5 टक्के व्याज जमा करण्यात काहीच अडचण येऊ नये.

दरम्यान, ईपीएफ हा सरकारी किंवा बिगर सरकारी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचार्‍यासाठी गुंतवणूकीचा एक प्रकार आहे जो त्याच्या भविष्यात उपयुक्त ठरतो. नियमांनुसार, ज्या कंपनीत किंवा संस्थेमध्ये 20 किंवा अधिक कर्मचारी आहेत, त्यांनी ईपीएफओमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

News English Summary: This is good news for EPFO’s six crore customers. The Employees Provident Fund Organization is expected to deposit 8.5 per cent total interest in the Employees’ Provident Fund Organization for the financial year 2019-20 till the end of December 2020. Earlier in September, the EPFO ​​had decided to pay the interest in two installments. The interest was to be 8.15 per cent in the first installment and 0.35 per cent in the second installment. However, according to media reports, the Labor Ministry has sent a proposal to the Finance Ministry to pay interest together. The finance ministry may approve the proposal in a few days. Thus, full interest can be paid within this month.

News English Title: EPFO interest will be deposited in employees bank account at the end of December news updates.

हॅशटॅग्स

#EPFO(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x