25 April 2024 11:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला
x

शेतकऱ्यांना दिलासा | पिक कर्ज वसुलीस दिली 31 जुलैपर्यंत मुदत वाढ

crop loan requirement

मुंबई, ०२ जुलै | शेतकऱ्यांनी मागील वर्षी राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक यांच्याकडून घेतलेल्या पीककर्ज परतफेडीसाठी शासनाने शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात दिलेल्या मुदतवाढीच्या तारखेपर्यंत म्हणजे 31 जुलै पर्यंत दर शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड वेळेत केली तर शेतकऱ्यांना व्याजात सवलत मिळेल, अशी माहिती राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच व्यापारी बँकांमार्फत पीक कर्जाचा पुरवठा केला जातो.

रिझर्व बँकेच्या नियमानुसार या घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड ही 365 दिवसांच्या मुदतीत करायची असते. जय शेतकरी या मुदतीत कर्जाची परतफेड करतात म्हणजे 30 जून पर्यंत ही मुदत असते. अशा शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देऊन त्यांचे व्याज माफ केले जाते. परंतु राज्यामध्ये सध्या उद्भवलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल व मे महिन्यामध्ये लॉक डाऊन लावण्यात आला होता.

त्यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांना आलेल्या त्यांच्या मालाच्या विक्री व्यवस्थेतील अडचणी आणि साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप देय असलेली उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत विचारात घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले. शासनाने आता 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या वाढीव मुदतीत जे शेतकरी कर्जाची परतफेड करतील त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ दिला जाईल. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचेही मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Extend period for crop loan refund news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x