मुकेश अंबानींची भूक वाढली आहे | त्यासाठी शेतकऱ्यांवर विधेयके लादली
पुणे, १६ डिसेंबर: मोदी सरकारचे कृषी कायदे हे अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या भल्यासाठी आहेत. मुकेश अंबानी यांची भूक वाढली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांवर नको असलेली विधेयके लादली जात असल्याचा आरोप खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. (Former MP Raju Shetty party will march on Mukesh Ambani’s Mumbai office)
राजू शेट्टी यांनी बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कार्यालयावर 22 तारखेला मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीतील रिलायन्सच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाईल. या मोर्चात बच्चू कडू आणि बाबा आढाव यांच्या संघटनांचाही सहभाग असणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील शेट्टी यांनी केले.
राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवरही टीकेची तोफ डागली आहे. सरकारला हे आंदोलन चिरडायचे आहे का? तसं केल्यास मोदी शहांना मोठी किंमत चुकवावी लागेल. सरकारी अन्न गोदामे अदानी, अंबानीच्या घशात घालण्याचे कारस्थान हे सरकार करत आहेत. अदानी, अंबानी नव्हे तर शेतकरीही या देशात राहतात, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. शिवाय, २२ डिसेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार, शेतकरी कामगार पक्ष,लोक संघर्ष मोर्चा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीतील रिलायन्स इस्टेटपर्यंत संघर्ष मोर्चा काढणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
News English Summary: The Modi government’s agricultural laws are for the benefit of industrialists like Ambani. Mukesh Ambani’s appetite has increased. Raju Shetty, MP and leader of Swabhimani Shetkari Sanghatana, alleged that unwanted bills were being imposed on farmers for this.
News English Title: Former MP Raju Shetty party will march on Mukesh Ambani’s Mumbai office News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News