11 December 2024 5:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News
x

तेव्हा राज ठाकरे आठवतील? मराठी युवकांच्या रोजगाराचा व मुंबईचा स्मार्ट गेम 'गिफ्ट'मार्गे होणार?

Gujarat, Narendra Modi, Gift City

अहमदाबाद : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांनी वातावरण ढवळून निघालं आहे. त्यात रोजगारासारखे महत्वाचे मुद्दे मोदींच्या भाषणातून लुप्त झाले आहेत आणि त्याची जागा हिंदुत्व आणि भारतीय लष्कराच्या शौर्याने घेतली आहे. देशात २ कोटी रोजगार निर्माण करण्याचं आमिष देशातील तरुणांना दाखवत प्रत्यक्षात ५ कोटीच्यावर तरुण देशभरात बेरोजगार केले गेले. केंद्र सरकारला त्याचं काहीच सोयर सुतक नाही अशीच एकूण परिस्थिती आहे. समाज माध्यमाच्या विकृतीतून अनेक तरुणांचे मेंदू धर्म आणि भारतीय लष्कराच्या शौर्याभोवती असे काही गोंगावात ठेवले आहेत की त्या ‘फेसबुक’ वरील फ्री नेटपॅकने आपल्याला कधीच बेरोजगार केलं आहे याची कल्पना देखील तरुणांना राहिलेली नाही.

महाराष्ट्रातील धक्कादायक परिस्थिती इतकी धक्कादायक आहे की, गुजराती नेत्यांचे आजच्या घडीला सर्वाधिक शुभचिंतक आणि समर्थक हे मराठी तरुण आहेत. गुजरातच मूळ असलेले नरेंद्र मोदी, अमित शहा, पियुष गोयल हे जणू आमचा भविष्यकाळच बदलणार आहेत याच अविर्भावात मराठी तरुण समाज माध्यमांवर फुलटाईम ऑनलाईन असतात. परंतु हेच गुजराती नेते महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी तरुणाच्या पोटापाण्याचा प्रश्न कायमचा हिरावून घेण्याची योजना सध्या गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये आखात आहेत. महाराष्ट्राच्या बाजूची इतर राज्य म्हणजे कर्नाटक आणि आंध्रप्रदेश देखील विकसित झाली. परंतु त्यामागे महाराष्ट्र घातकी योजना नव्हत्या, जे गुजरातमध्ये सध्या सुरु आहे. मराठी तरुणांचं वाचनच संपल्याने ते संभ्रम निर्माण करणाऱ्या पेड माध्यमांच्या हेडलाईन्समधून फसले जात आहेत. परंतु तेच मराठी तरुणांना समजवून सांगणारे राज ठाकरे देखील त्यांच्यासाठी टिंगल टवाळीचा विषय बनले आहेत हे धक्कादायक आहे. कारण त्यांच्या समाज माध्यमांच्या विकृतीतून इतका ब्रेनवॉश केला आहे की कोणाचंही समजून किंवा एकूण घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, हे त्यांच्याशी संवाद साधल्यावर स्पष्ट होत. दुर्दैवाने त्यात सुशिक्षित मूर्खांचा अधिक भरणा आहे हे धक्कादायक आहे हे विशेष म्हणावं लागेल.

देशाची नवी आर्थिक राजधानी उभारणीचं अर्थात फायनान्शियल कॅपिटल सिटीची योजना गुजरातमध्ये आखली गेली आहे. मागील वर्षी म्हणजे २०१८ पासून त्यावर प्रत्यक्ष जोरदारपणे काम सुरु आहे. स्वतः नरेंद्र मोदी त्यावर विशेष लक्ष ठेवून आहेत. सिंगापूर आणि हॉंगकॉंगच्या धर्तीवर अहमदाबाद-गांधीनगरच्या दरम्यान निर्माण करण्यात येत असलेलं हे नवं शहर गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी अर्थात ‘गिफ्ट’ या नावाने उभारण्यात येत आहे. दरम्यान, या योजनेचा आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास केल्यास, सदर योजना मुंबईचं आर्थिक अस्तित्वच संपुष्टात आणण्यासाठीच आखली जात आहे याचा प्रत्यय येईल . जागतिक आर्थिक संघटनेने म्हणजे ‘डब्लू.इ.एफ’ने त्याच्या अहवालात म्हटलं आहे की, सिंगापूर, हॉंगकॉंग ही शहर जगातील मोठी आर्थिक केंद्र आहेत. त्यामुळे तिथेच सर्वाधिक गुंतवणुकीला पसंती दिली जाते. त्यामुळे मुंबईच भौगोलिक महत्व लक्षात घेऊन त्यावरच घाव घालून मुंबईच आर्थिक अस्तित्व प्रथम संपुष्टात आणून मुंबईतील महत्वाची केंद्र सरकारची कार्यालयं, मोठं मोठे उद्योग समूह आणि निर्यातीसाठी वारली जाणाऱ्या बंदरांचे महत्व कमी करून तिथल दळणवलं गुजरातमधील अदानी बंदराकडे वर्ग करण्याची योजना अमलात आणली आहे.

त्याचीच उदाहरणं द्यायची झाल्यास दक्षिण मुंबईतील पंचरत्न बिल्डिंगमधील डायमंड मार्केट, भिवंडीचे कपडा मार्केट, यार्न आणि साडी मार्केट गुजराती व्यापाऱ्यांना हाताशी धरून सुरतला घेऊन गेले. बेलापूरचे रासायनिक कारखाने गुजरातमधील भरूच नजिकच्या दहेजमध्ये घेऊन गेले. तर मुंबईतील अनेक आयटी हब्स अहमदाबादमध्ये वळवले आहेत, तर टाइल्सचा उद्योग वापीला पळवला आहे. तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या भूगोलाचा अभ्यास केल्यास पालघर आणि आसपासचा भूभाग गुजरात सीमेला लागून असल्याने सध्या गुजराती समाज इथले शेकडो एकरचे प्लॉट स्वतःच्या समाजाकडे पैसे फेकून घेत आहे. बुलेट ट्रेन सत्यात उतरल्यास हा पट्टा नावाला महाराष्ट्राचा भूभाग असेल, पण इथली भाषा आणि संस्कृती केवळ गुजराती असेल यात काहीच शंका नाही. याच पट्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी आणि आगरी समाज असल्याने त्यांच्या अज्ञानाचा फायदा जमिनी हडप करणारे गुजराती व्यापारी घेताना दिसत आहेत. आजही या सीमेवरील परिसराचा फेरफटका मारल्यास इथे नावांच्या पाट्या देखील मोठ्या प्रमाणावर गुजराती भाषेत दिसतात.

स्वतः नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्याने स्वतःच्या कार्यकाळात ते देशाला स्मार्ट सिटीची स्वप्न दाखवत वास्तविक गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’वर केंद्रित झाले आहेत. देशातील इतर नियोजित स्मार्ट सिटी या केवळ कागदावर असतील आणि इंटरनेट दिलं म्हणजे शहर स्मार्ट झालं हा बिनडोक विचार तरुणांच्या माथी थोपवला आहे. दरम्यान, राज ठाकरे याच विषयावर महाराष्ट्रातील तरुणांना संधी मिळेल तिथे समजावत आहेत आणि याची पूर्ण जाणीव गुजरातच्या नेत्यांना असल्याने ते राज ठाकरेंच्या वक्तव्यावर व्यक्त होण्याच्या रणनीतीचा अवलंब करताना दिसत आहे. कारण राज ठाकरेंच्या प्रश्नांना उत्तर दिली तर विषय मोठ्याप्रमाणावर प्रकाशझोतात येईल आणि गुजराती उद्योग नीती कचाट्यात अडकेल हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळेच सध्या उत्तर भारतीयांपेक्षा गुजराती समाज हा राज ठाकरेंचा सर्वाधिक द्वेष करणारा झाल्याचे सहज निदर्शनास येते. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांनी हा विषय गांभीर्याने आणि अभ्यासपूर्ण समजून घेऊन राज्याच्या आर्थिक विकासाचा मुद्दा उचलून धरला पाहिजे. कारण त्यातूनच रोजगार निर्मिती होत असते आणि जर उद्योगच वाढले किंवा टिकले नाहीत तर नोकऱ्या मिळतील तरी कुठून याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x