20 April 2024 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

यूपीतील जंगलराजची पोलखोल करणाऱ्या भारत समाचारच्या कार्यालयावर सुद्धा इन्कम टॅक्सची धाड

Bharat Samachar

लखनऊ, 22 जुलै | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशातील वास्तव आणि गंगा घाटावरील गाडलेल्या मृतांच्या संबधित स्पॉट रिपोर्टींग केल्यानंतर देश आणि जगभर मोदी सरकारच भांड फुटलं होतं. मात्र त्या धाडसी रिपोर्टींगची सुरुवात केली होती उत्तरेकडील प्रमुख वृत्तपत्र समूह दैनिक भास्करने हे देखील देशाला पाहायला मिळालं होतं. मात्र त्याच समूहावर उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीपूर्वी दबाव टाकला जातं आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे.

कारण, योगी सरकार आणि मोदी सरकारचं कोरोना आपत्तीतील वास्तव जगासमोर मांडणाऱ्या दैनिक भास्कर माध्यम समूहाच्या विविध कार्यालयांवर आज आयकर विभागाने छापेमारी केली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार दैनिक भास्कर समूहाच्या नवी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांवर आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. या कार्यालयांची झाडाझडती घेतली जात आहे. दैनिक भास्कर समूह हा देशातील प्रसिद्ध माध्यम समूहांपैकी एक आहे.

कर चोरी प्रकरणात आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाचाच महत्त्वाचा भाग असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मात्र, यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, भास्कर समूहाच्या कार्यालयांवर छापेमारी केली जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

यूपीतील भारत समाचार वृत्त वाहिनीवर सुद्धा आयकर विभागाची धाड:
दुसरीकडे उत्तर प्रदेशातील भारत समाचार या वृत्त वाहिनीच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली असून या वाहिनीने योगी सरकारच्या अनेक विषयाचं जनतेसमोर वास्तव मांडलं आहे. यूपीतील जंगलराजाची तसेच महिलांवरील अत्याचाराची मोठी पोलखोल या वाहिणीने सातत्याने केल्याने आज ते देखील दबावाच्या रडारवर आल्याचं पाहायला मिळतंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Income Tax department raided on Bharat Samachar office before Uttar Pradesh Assembly Election 2022 news updates.

हॅशटॅग्स

#IncomeTax(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x