20 April 2024 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरमागे तब्बल ७३ ची पातळी ओलांडली

नवी दिल्ली : अमेरिकी डॉलरपुढे भारतीय रुपयाचे विनिमय मूल्य रोज नवे नीचांक गाठताना दिसत आहे. सर्व प्रमुख आशियाई देशांच्या चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य खूप वेगाने घसरत आहे. आज बुधवारी सकाळच्या सत्रात रुपया ३४ पैशांच्या घसरणीने प्रति डॉलर ७३.३४ असा विक्रमी निच्चांकी तळ रुपयाने गाठला आहे, परिणामी महागाईमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.

कच्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजापेठेतील किमती प्रति बॅरेल ८५ डॉलर पर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या आशिया खंडात भारत एक प्रमुख अर्थव्यवस्था आहे, त्या प्रमुख आशियाई चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य सर्वात वेगाने घसरत असून देशाची ८० टक्के इंधन गरज आयातीद्वारे भागविणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी रुपयाची घसरण म्हणजे मोठी चिंतेचा बाब आहे आहे.

दरम्यान, इंधन महागल्याने महागाईमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यात पुन्हा दिवाळी दसरा जवळ आल्याने महागाई अजून भडकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाचं वाढत्या महागाईमुळे कंबरडं मोडण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x