आधार-पॅन कार्ड 'या' तारखे आधी करा लिंक | अन्यथा भरावा लागेल १० हजार रुपयांचा दंड
मुंबई, २५ मार्च: तुम्हाला कोणतेही आर्थिक व्यवहार करायचे असेल तर तुम्हाला आधारकार्ड आणि पॅनकार्डची गरज भासते. त्याचबरोबर ही भारतीय असल्याची ही दोन महत्त्वाची ओळखपत्रे ही एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोणतेही महत्त्वाचे आणि मोठे आर्थिक व्यवहार करता येणार नाही. अजूनही तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर ताबडतोब करा. कारण सरकार या अशा लोकांवर कडक कारवाई करणार आहे. त्यासाठी आयकर विभागाने अंतिम तारीख दिली आहे. त्या तारखेआधी तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करा.
रिपोर्टनुसार, येत्या 31 मार्च 2021 पर्यंत तुम्ही तुमचे आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. या तारखेपर्यंत जर कुणी हे काम केले नाही तर त्यांना 10,000 रुपये दंड भरावा लागणार आहे. आयकर विभागाने याबाबत माहिती दिली असून आधारकार्ड पॅन कार्डशी लिंक न करणा-यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो असेही सांगण्यात येत आहे. हे काम न करणा-यांना पॅनकार्डधारकांचे न केवळ गैर पॅनकार्डधारक माानले जाईल तर त्यांना आयकर अधिनियमांतर्गत कलम 272बी 10,000 रुपयांचा दंड भरावा लागेल.
बँक अकाउंट खाते उघडण्यासाठी, म्युचअल फंड वा शेअर खरेदी करण्यासाठी वा 50,000 रुपयांपेक्षा जास्त कॅश ट्रान्जेक्शन करण्यासाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. तथापि, असे सर्व इनऑपरेटिव पॅनकार्ड ऑपरेटिव होतील. त्यासाठी आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक होणे गरजेचे आहे.
- आधार आणि पॅन कार्ड SMS द्वारे लिंक करण्यासाठी 56161 किंवा 567678 या क्रमांकावर टेक्स्ट मेसेज करा.
- यासाठी UIDPAN<12 Digit Aadhaar> <10 Digit PAN> असा मेसेज करा.
- उदा. तुमचा आधार कार्ड नंबर 586738291086 असेल आणि पॅन कार्ड नंबर KBJH11234M असेल.
- तर मेसेज UIDPAN 586738291086 KBJH11234M असा टाईप करा आणि मेसेज 56161 किंवा 567678 या क्रमांकावर पाठवा.
News English Summary: If you want to do any financial transaction, you need Aadhaar card and PAN card. At the same time, these two important Indian identity cards need to be linked to each other. Without it no important and big financial transactions can be done. If you still have not linked your Aadhar card to PAN card, do it immediately. Because the government is going to take strict action against such people. The Income Tax Department has given a deadline for this. Before that date you link your Aadhar card with PAN card.
News English Title: Link your Aadhaar Pan card before this date otherwise pay a penalty news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा