18 August 2019 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अर्थमंत्र्यांची पत्नी विश्वस्त पदी; तिरुपती देवस्थानला २०० कोटींचा भूखंड १ रुपया दराने; सरकारचा पराक्रम काश्मीरबाबत पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु; सैन्य दलाचे अधिकारीही उपस्थित मी तिथे होती, दिल्ली विद्यापीठात घोषणाबाजीवेळी कन्हैय्या कुमार तेथे नव्हता: भाजप खासदाराची पत्नी सत्तेत आपल्या विचाराचे लोक आहेत; आम्ही सरकारी धोरणात हस्तक्षेप करतो, पण...... बहुमताच्या जोरावर शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू का केला नाही: बच्चू कडू ‘वंचित’कडून २८८ जागा लढण्यासाठी मोर्चेबांधणी; भाजप-सेना देखील स्वबळावर? सविस्तर कारण उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राणे परत आले तर मी घर सोडीन’
x

दूध महागलं! निवडणुकीत 'चाय पे चर्चा' संपताच सरकारने प्रति लिटर 3 रू अनुदान बंद केले

दूध महागलं! निवडणुकीत ‘चाय पे चर्चा’ संपताच सरकारने प्रति लिटर 3 रू अनुदान बंद केले

मुंबई : लोकसभा निवडणूक संपताच आणि केंद्रात बहुमताने मोदी सरकार पुन्हा विराजमान होताच, महागाईत आता पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. खाजगी आणि सहकारी दूध महासंघाची महत्वाची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीत गायीच्या दुधाच्या दरात २ रूपयांची वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दुधाचे नवे दर ८ जूनपासून लागू करण्यात येणार आहे. सध्या गायीच्या दुधाचा दर ४२ रूपये प्रति लिटर असून तो आता ४४ रूपये प्रति लिटर होणार आहे.

आम्ही २५ रूपये प्रति लिटर दराने दूध विकत घेतो. सरकारने यावर प्रति लिटर मिळणारे ३ रूपयाचे अनुदान देखील एप्रिल महिन्यापासून बंद केले आहे. त्यामुळे आमच्यावर याचा अतिरिक्त भार पडत असून मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे. त्यामुळे आम्हाला दर वाढवण्यावर विचार करावा लागत असल्याचे महाराष्ट्र दुग्ध उत्पादन आणि प्रक्रिया संघटनेचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी दिली होती.

गेल्या अनेक दिवसांमुळे सरकारकडून मिळणारे अनुदान बंद झाल्याने दुध उत्पादन शेतकऱ्यांना प्रति लिटर २३ ते २५ रुपयाचा भाव देण्यात येत होता. परंतु संघटनेने प्रति लिटर ३० रूपयांचा दर देण्याची मागणी केली होती. एकीकडे दुष्काळाचे सावट आणि दुसरीकडे जनावरांना देण्यात येणाऱ्या चाऱ्याच्या किंमतीत झालेली लक्षणीय वाढ यामुळे हजारो शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे कमीतकमी पुढील ३ महिन्यांसाठी सरकारने ५ रूपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी केली असल्याचेही संघटनेचे उपाध्यक्ष गोपाळ म्हस्के यांनी सांगितले होते. त्यानंतर बुधवारी झालेल्या बैठकीत गायीच्या दुधाचे दर २ रूपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत केवळ लोकांनां स्वतःकडे आकर्षित करून मार्केटिंग करण्यासाठी चाय पे चर्चा करणारे मोदी याविषयात काही बोलतील अशी अपेक्षा नाही. त्यामुळे निवडणूक संपताच चाय देखील संपल्याची चर्चा रंगली आहे. मात्र त्या चाय’साठी लागणाऱ्या दुधाच्या भावाकडे सरकारचे किती लक्ष आहे याचा प्रत्यय येतो आणि याचा थेट फटका सामान्य लोकांना बसणार असल्याने सरकार नमती भूमिका घेईल अशी देखील शक्यता दिसत नाही.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या