20 April 2024 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

अर्थव्यवस्था धोक्यात आहे | तरुणांना रोजगार हवा आहे | मोदींच ते ट्विट व्हायरल

Narendra Modi, old tweets, Employment, viral on social media

नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी: सोशल नेटवर्कींगवर मागील काही दिवसांपासून रोजगारासंदर्भातील विषय चांगलाच चर्चेत आहे. ‘मोदी रोजगार दो’ हा ट्रेण्ड रविवारी आणि सोमवारी ट्विटरवर टॉप ट्रेण्डींग टॉपिकमध्ये होता. मोदीजी, भाषणं नको रोजगार द्या असं म्हणणारे लाखो ट्विट करण्यात आले.

‘मोदी रोजगार दो’ हा हॅशटॅग रविवारपासून सोशल नेटवर्किंगवर ट्रेण्ड होताना दिसत आहे. या हॅशटॅगवर सहा लाख ७४ हजारांहून अधिक जणांनी ट्विट केलं आहे. अनेकांनी भाजपाने सत्तेत येताना दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलेलं त्याचं काय झालं असा प्रश्न विचारला आहे. राजकीय विषयांमध्ये मोदी रोजगार दो हा हॅशटॅग भारतात टॉप ट्रेण्डींग विषय आहे.

सीएमआयईईच्या अहवालानुसार २०२० मध्ये एक कोटी ७७ लाख पगारदार व्यक्तींनी आपला रोजगार गमावला. खास करुन मार्चमध्ये लॉकडाउन लागू झाल्यानंतर जून आणि जुलैपर्यंत अनेकांनी आपला रोजगार गमावला. त्यामुळेच आता अर्थव्यवस्था हळूहळू सुरळीत होत असतानाच सरकारने दिलेलं आश्वासन पाळत बेरोजगारांना नोकरी द्यावी अशी मागणी ट्विटवरुन केली जात आहे.

त्यात आता मोदींचे याच विषयाला अनुसरून जुने ट्विट्स व्हायरल होतं आहेत. यामध्ये मोदी ढासळलेली अर्थव्यवस्था आणि रोजगारावर बोलताना दिसत आहे. मोदींची २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या आधीची ४ ट्विट्स समाज माध्यमांवर व्हायरल होतं आहेत.

 

News English Summary: The issue of employment has been a hot topic on social networking for the past few days. The trend ‘Modi Rozgar Do’ was one of the top trending topics on Twitter on Sunday and Monday. Modiji, millions of tweets were sent saying don’t give speeches, give employment.

News English Title: Narendra Modi old tweets related to employment gone viral on social media news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x