19 April 2024 6:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

मोदी-शहांच्या उपस्थितीत चर्चा व्हावी | पेगासस प्रकरणी संसदेत गदारोळ, प्रचंड घोषणाबाजी

Pegasus hacking

मुंबई, २७ जुलै | पावसाळी अधिवेशनात आजही पेगासस हेरगिरी प्रकरणी गदारोळ सुरूच आहे. राज्यसभेचे कामकाज 11 वाजता सुरू होताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. पेगासस हेरगिरी प्रकरणी संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी करण्यात आली. याच गदारोळात संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर पुन्हा 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

लोकसभेत सुद्धा विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. अशात कनिष्ठ सभागृहाचे कामकाज सुद्धा आधी 11.45 वाजेपर्यंत आणि नंतर 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. 12 वाजता कामकाजा सुरुवात होणार तेवढ्यात विरोधी पक्षाच्या खासदारांनी ठिय्या मांडला. यानंतर लोकसभेचे कामकाज 12.30 वाजेपर्यंत स्थगित करावे लागले. तत्पूर्वी सोमवारी सुद्धा दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी पेगाससचा मुद्दा उचलून धरला. काँग्रेस खासदार मनिका टागोर यांनी लोकसभा स्थगनाचा प्रस्ताव मांडला. दोन्ही सभागृहांचे कामकाज मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

मोदी, अमित शहांनी पेगाससवर संसदेत चर्चा करावी:
देशभरातील काही पत्रकार, राजकारणी आणि इतर महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवली जात आहे. यासाठी इस्रायली स्पायवेअर पेगाससचा वापर होत आहे. विशेष म्हणजे, हे सॉफ्टवेअर इस्रायलकडून केवळ सरकारांनाच विकल्या जाते. याच मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृ,हमंत्री अमित शहा यांनी संसदेत हजर राहावे आणि त्यांच्या हजेरीतच या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. पावसाळी अधिवेशनाचा एक आठवडा अशाच गोंधळात निघून गेला. आता दुसरा आठवडा सुद्धा वादळी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Parliament monsoon session 2021 Pegasus snooping row news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x