29 March 2024 2:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

मोदी सरकारच्या तिजोरीत खडखडाट; नव्या योजनांना १ वर्षासाठी स्थगिती

PM Narendra Modi, Atmanirbhar Bharat, FM Nirmala Sitharaman

नवी दिल्ली, ५ जून: कोरोनाच्या संकटकाळात अर्थव्यस्थेला मोठा फटका बसला आहे. यासाठी अर्थव्यस्था पुन्हा स्थिरावण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील एक वर्षासाठी नव्या योजनांना स्थगिती देण्यात आली आहे. तसंच त्यावर होणाऱ्या खर्चावर देखील रोख लावण्यात आला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या नव्या योजना थेट ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय वित्त मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात सरकारची कोणतीही नवी योजना लागू केली जाणार आहे. मात्र असं असलं आत्मनिर्भर भारत अभियान, पंतप्रधान गरीब कल्याण योजना आदींना कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही विभागाने नव्या योजनेची घोषणा करू नये, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. ही स्थगिती स्वीकृत किंवा मूल्यांकन श्रेणीतील योजनांना देण्यात आली आहे. तसंच वित्त मंत्रालयाच्या जावक विभागाने तत्त्वता परवानगी दिलेल्या योजनांसाठीही हा आदेश लागू होईल. सध्या आत्मनिर्भर भारत आणि पंतप्रधान गरीब कल्याण आदी योजनांवर लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना देण्यात आली आहे.

मात्र आत्मनिर्भर भारत आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनांना कुठल्याही प्रकारची स्थगिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, कुठल्याही मंत्रालयाने नव्या योजनांची घोषणा करू नये, तर पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करावे, असे वित्त मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सरकारच्या तिजोरीत येणाऱ्या महसुलात मोठी घट झाली आहे. महालेखापालांकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात सरकारला २७ हजार ५४८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. तर तर सरकारला ३.०७ लाख कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. आर्थिक संकटामुळे चालू आर्थिक वर्षात सरकारकडून कर्जही अधिक घेतले जात आहे. या आर्थिक वर्षासाठी कर्ज घेण्याचे आपले अनुमान सरकारने वाढवले असून, ते ४.२ लाख कोटींवरून १२ लाख कोटी रुपये केले आहे.

 

News English Summary: The Corona crisis has hit the economy hard. To this end, the Union Finance Ministry has taken an important decision to stabilize the economy. New plans have been postponed for the next one year. Also, cash has been levied on the expenses incurred on it. Therefore, the new schemes approved in the budget have been postponed till March 31, 2021.

News English Title: PM Modi government will not start any new scheme till March 2021 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x