20 April 2024 4:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची गती वाढवण्याची जबाबदारी खासगी क्षेत्राचीही | RBI गव्हर्नर

Private Sector, Recovery Of The Economy, RBI Governor Shaktikant Das, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १६ सप्टेंबर : अर्थव्यवस्थेनं अद्यापही गती पकडलेली नसून ती हळूहळू रुळावर येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी दिली. रिझर्व्ह बॅंकेकडून मोठ्या प्रमाणात रोख रकमेच्या उपलब्धतेमुळे सरकारला कमी दराने आणि कोणत्याही अडचणीशिवाय मोठ्या प्रमाणात कर्ज दिले गेले आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक असलेली पावले उचलण्यास केंद्रीय बँक पूर्णतः तयार आहे.

दरम्यान, करोना महामारीचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी कोणतीही पावलं उचलण्याची रिझर्व्ह बँक तयार अशल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. तसंच अर्थव्यवस्थेतील उभारी देण्याची गती वाढवण्यासाठी खासगी क्षेत्रांनीही योगदान द्यावं असं ते म्हणाले. उद्योग संघटना फिक्कीनं बुधवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

जीडीपीच्या आकडेवारीवरून करोनाचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला आहे याचे संकेत मिळत असल्याचे दास म्हणाले. “करोनानंतर आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी खासगी क्षेत्रांना रिसर्च आणि इनोव्हेशन, अन्न प्रक्रिया आणि पर्यटन क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावण्याची आवश्यकता आहे. पर्यटन क्षेत्रात अनेक व्यापक संधी उपलब्ध आहेत आणि खासगी क्षेत्रांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे,” असंही ते म्हणाले.

बर्‍याच रेटिंग एजन्सींनी चालू आर्थिक वर्षात भारताच्या विकासदरात घट होण्याची शक्यता वर्तविली आहे. अशा परिस्थितीत आरबीआयचं हे विधान खूप महत्त्वाचं आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत नऊ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने 2020-21पर्यंतच्या भारताच्या वाढीचा अंदाज नऊ टक्क्यांपर्यंत खाली आणला. भारतीय अर्थव्यवस्थेत मूडीजच्या 11.5 टक्के आणि चालू आर्थिक वर्षात 10.5 टक्के घट होण्याचा अंदाज आहे. गोल्डमॅन सॅशचा अंदाज आहे की, चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 14.8 टक्क्यांनी घसरेल.

इतर महत्वाच्या बातम्या:

एअर इंडियाला खरेदीदार न मिळाल्यास कायमची बंद करणार | मोदी सरकारची माहिती

इनकमिंग सुरूच | अभ्युदय सहकारी बँकेचे मानद अध्यक्ष सीताराम घनदाट यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भारतीय स्टार्टअप कंपन्यांमध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक | केंद्राची माहिती

Sarkari Naukri | बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीची मोठी संधी | ऑनलाईन अर्जाला सुरुवात

Health First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील

Health First | कडीपत्त्याचे चमत्कारिक फायदे | फायदाच फायदा होईल | नक्की वाचा

दिशाच्या लिव्ह इन पार्टनरचा जबाब महत्त्वाचा | नितेश राणेंच अमित शहांना पत्र

 

News English Summary: The country’s economic recovery is likely to be gradual as the rising infections continue to pose a risk, RBI Governor Shaktikanta Das said on Wednesday. Addressing the FICCI National Executive Committee Meeting, the central bank chief said that the economic recovery is not fully entrenched. He added that the GDP data for the first quarter (Q1) was a telling reflection of how COVID-19 affected the economy.

News English Title: Private Sector Should Also Contribute To Accelerate The Recovery Of The Economy RBI Governor Shaktikant Das Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Reserve Bank of India(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x