14 December 2024 3:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

कृषी कायद्याच्या वादाशी संबंध नाही | रिलायन्स समुहाची कोर्टात धाव

Reliance group, Jio, Mukesh Ambani, Farm Laws

मुंबई, ४ जानेवारी: रिलायन्स समुहाने नव्या कृषी कायद्यांचा कंपनीशी संबंध जोडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबत स्पष्टीकरण देताना शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी कंपनी आपल्या स्तरावर कोणती पावले उचलत आहे याची माहिती दिली आहे. रिलायन्स रिटेल लिमिटेड, रिलायन्स जियो इन्फोकॉम लिमिटेड आणि अन्य कुठल्याही सहाय्यक कंपनीने यापूर्वी कधीही कॉर्पोरेट किंवा काँट्रॅक्ट फार्मिंग केलेले नाही. तसेच यापुढेही अशा प्रकारची कुठली योजना नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या संपत्तीच्या आणि सुविधांच्या रक्षणासाठी रिलायन्सनं सरकारी हस्तक्षेपाची मागणी करत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ इंडियाने प्रकाशित केले आहे.

रिलायन्सला विरोध करण्यासाठी पंजाबमध्ये अनेक ठिकाणी कंपनीच्या जीओचं नेटवर्क पुरवणाऱ्या टॉवरचीही मोडतोड केली. आता या सर्व प्रकरणानंतर रिलायन्सने एक अधिकृत पत्रच जारी केलं असून शेतकरी आंदोलनामध्ये होणाऱ्या विरोधावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. आमच्या कंपनीचं या कृषी कायद्यांशी काहीही देणघेणं नाहीय. आम्हाला त्यापासून काहीही फायदा होणार नसल्याचे रिलायन्सने या पत्रकात म्हटलं आहे. रिलायन्सने सोमवारी एक निवेदन जारी करून हे स्पष्ट केले आहे की ते शेतकर्‍यांकडून थेट धान्य खरेदी करत नाही.

  • कॉन्ट्रॅक्ट फार्निंगचं रिलायन्ससोबत कोणतंही देणं घेणं नाही.
  • कोणत्याही कॉर्पोरेट फार्मिंगसाठी कंपनीने जमीन घेतली नाही.
  • शेतीसाठी कधीही जमीन खरेदी करणार नाही.
  • RIL शेतकऱ्यांकडून थेट धान्य अथवा शेतमाल खरेदी करत नाही.

 

News English Summary: He also demolished towers supplying the company’s GEO network in several places in Punjab to oppose Reliance. Now, after all these cases, Reliance has issued an official letter and for the first time commented on the protests in the farmers’ movement. Our company has nothing to do with these agricultural laws. “We will not benefit from it,” Reliance said in a statement. Reliance issued a statement on Monday stating that it does not buy food grains directly from farmers.

News English Title: Reliance group says it has nothing to do with farm laws and does not benefit from them news updates.

हॅशटॅग्स

#Mukesh Ambani(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x