अजून एक धक्कादायक अंदाज | रिलायन्सच्या शेअर 'इतका' कोसळणार
मुंबई, २ नोव्हेंबर: कोरोना आपत्ती आणि लॉकडाउनमुळे एकूण इंधनाची मागणी प्रचंड प्रमाणात घटली आणि परिणामी कंपनीच्या नफ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे. लॉकडाउनमुळे ऑइल रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्सच्या उद्योगात मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. परिणामी कंपनीला नकारात्मक कामगिरीला तोंड द्यावं लागलं आहे. मात्र त्यात अजून एक धक्कादायक अंदाज व्यक्त झाल्याने रिलायन्सची चिंता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. रिलायन्सच्या नकारात्मक कामगिरीनंतर ब्रोकरेज संस्थांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा (Reliance Industries Share value) आढावा घेऊन शेअरबाबत महत्वपूर्ण अंदाज व्यक्त केला आहे.
Macquarie या प्रसिद्ध ब्रोकरेज संस्थेने रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर तब्बल ४२ टक्क्यांनी कोसळेल, असा धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) शेअरला ‘underperform’ चे रेटिंग Macquarie च्या मते रिलायन्सचा शेअर तब्बल ११९५ रुपयांपर्यंत खाली कोसळेल, असा चिंता वाढविणारा अंदाज व्यक्त केला आहे. आज शेअर बाजारात रिलायन्सचा शेअर एकूण ९ टक्क्यांनी खाली कोसळला आणि तो १८७३ रुपयांपर्यंत स्थिरावला आहे.
मात्र एडलवाईज सिक्युरिटीज आणि एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेस (Edelweiss Securities and M K Global Financials Services) या संस्थांनी रिलायन्सच्या शेअरला होल्ड करण्याचे रेटिंग दिले आहे. दोन्ही संस्थांनी रिलायन्सच्या शेअरची टार्गेट प्राईस अनुक्रमे २१०५ आणि १९७० रुपये ठेवली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत तब्बल ९,५६७ करोड रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत म्हणजे याच कालावधीत कंपनीला एकूण ११,२६२ कोटी रुपयांचा नफा झाला होता. परिणामी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा या तिमाहीत नफ्यात तब्बल १५ टक्क्यांची घट नोंदवली गेली आणि त्याचा फटका कंपनीला बसला आहे.
News English Summary: The Corona disaster and the lockdown have led to a huge drop in overall fuel demand, resulting in a sharp drop in the company’s profits compared to last year. The lockdown has had a major economic impact on the oil refining and petrochemicals industries. As a result, the company is facing negative performance. But another shocking prediction could raise concerns for Reliance. Following the negative performance of Reliance, brokerage firms have reviewed Reliance Industries and made important predictions about the stock.
News English Title: Reliance industries share may down till 42 percent said Macquarie Broker News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट