12 December 2024 12:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

गॅस सिंलिंडरच्या दरात पुन्हा वाढ | आजपासून गॅसच्या किमतींत 25 रुपयांची वाढ

Oil companies, hiked gas prices, LPG Gas Price

मुंबई, ०१ मार्च: एकाबाजूला पेट्रोल आणि डीझेलच्या किमती वाढत असतानाच सामान्य नागरिकांच्या खिशाला आता गॅसने सुद्धा कात्री लावली. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून गॅसच्या किमतींमध्ये 25 रुपयांची वाढ केली आहे. दिल्लीत आता सबसिडी नसलेला LPG सिलेंडर 819 रुपयांत मिळत आहे. आधी याची किंमत 794 रुपये एवढी होती. 2021 मध्ये सुरुवातीच्या दोन महिन्यांतच घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये तब्बल 125 रुपयांची वाढ झाली आहे. 1 जानेवारी रोजी जे सिलेंडर 694 रुपयांना मिळत होते ते आता 819 रुपयांवर पोहोचले आहे.

फेब्रुवारी महिन्यात घरातील एलपीजी सिलेंडरच्या किमती तीनदा वाढवण्यात आल्या आहेत. सरकारने 4 फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये 25 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी त्यात 50 रुपयांची आणि 25 फेब्रुवारी रोजी पुन्हा 25 रुपयांची वाढ केली. अर्थात एका महिन्यातच सिलेंडरचे भाव 100 रुपयांनी वाढवण्यात आले.

दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते की, तेल उत्पादक देशांकडून कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे पेट्रोलियम पदार्थ देशात महाग होत आहेत. त्यांच्या देशाच्या हितासाठी अधिक नफा मिळविण्यासाठी, कच्च्या तेलाचा पुरवठा करणारे देश कच्च्या तेलाच्या किंमती वाढवत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबद्दल धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, हिवाळ्यामुळे डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले आहेत, हिवाळ्यात असे होते. आता हिवाळा संपला आहे, मग किंमती कमी होतील.

 

News English Summary: On the one hand, while petrol and diesel prices are going up, the pockets of the common man are now being slashed by gas. State-owned oil companies have hiked gas prices by Rs 25 from today. In Delhi, a non-subsidized LPG cylinder is now available at Rs 819. Earlier, it was priced at Rs 794. In the first two months of 2021 alone, domestic cylinder prices have risen by as much as Rs 125. The price of a cylinder which was Rs 694 on January 1 has now gone up to Rs 819.

News English Title: State owned oil companies have hiked gas prices by Rs 25 from today news updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x