20 April 2024 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला
x

शेअर बाजारात कोसळला , सेन्सेक्स तब्बल १००० अंकांनी घसरला

मुंबई : आंतरराष्ट्रीय शेअर मार्केटमधील घडामोडींमुळे आज भारतीय शेअर बाजारात तीव्र पडसाद उमटले आहेत. सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला आणि काही मिनिटात गुणवणूकदारांचं अरबो रुपयाचं पाणी झालं आहे. त्यात भर म्हणजे भारतीय रुपयाची घसरण सुद्धा सुरुच असून रुपयाने गुरूवारी ऐतिहासिक तळ गाठला आहे.

मागील काही दिवस भारतीय शेअर मार्केटमध्ये रोज पडझड सुरु असतानाच बुधवारी शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्सने ४६१ अंकांची मुसंडी घेतली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकूण ३ लाख कोटींची भर पडली होती. परंतु, गुरुवारी शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीत प्रचंड मोठी घसरण झाली आणि गुंतवणूकदारांना पुन्हा पडझडीच्या भूकंपाचा तडाखा बसला आहे.

आज गुरुवारी सकाळी शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्स तब्बल ९०० अंकांनी खाली गेला. सेन्सेक्स १००० अंकांच्या घसरणीसह ३३, ८३३. २७ वर पोहोचला असून निफ्टीत सुद्धा ३०० अंकांची अशी मोठी घसरण झाली पाहायला मिळत आहे. निफ्टीचा निर्देशांक १०, १५९. ९० वर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील मंदीचा फटका भारताच्या शेअर बाजारावर बसला असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x