14 December 2024 4:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

कोरोना आपत्ती: RBI नुकसान रोखण्याच्या मोहिमेवर काम करत आहे - शक्तिकांत दास

RBI Repo rate, Corona Crisis, Corona Virus, Covid19

मुंबई, १७ एप्रिल: कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे आर्थिक परिस्थितीवर परिणाम झालेला असला तरी चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर १.९ टक्के राहिल. भारत कोणत्याही स्थितीत नकारात्मक विकासदराच्या दिशेने जाणार नाही, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. सध्याच्या स्थितीत अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी शुक्रवारी सकाळी संवाद साधला. यामध्ये त्यांनी रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या नव्या निर्णयांची माहिती दिली.

आरबीआयकडून नाबार्ड, सीआयडीबीआय, एनएचबीला ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यात नाबार्डला २५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. सीआयडीबीआयला १५ हजार कोटी आणि एनएचबीला १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. नाबार्डकडून शेती आणि ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवठा केला जातो. एसआयडीबीय छोटया उद्योगांशी संबंधित असलेली बँक आहे. तर एनएचबी गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित असलेली बँक आहे.

यंदा पाऊसही १०० टक्के होणार आहे. हे दिलासादायक आहे. कोरोनाचा जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला आहे. आरबीआय देशात नवीन छापलेले चलन आणत आहे. कोरोनामुळे निर्यात घटली आहे. तसेच वीजेची मागणीही कमी झाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये विक्री घटली आहे. बाजारात चलनाची कमतरता भासू न देणे. बाजारांचे कामकाज प्रभावित न होऊ देणे हे लक्ष समोर ठेवण्यात आले आहे. आपला डेटा सांगतोय की, इंटरनेट बँकिंगद्वारे चांगले काम होत आहे. अडचणींमध्येही एटीएमद्वारे चांगले काम होत आहे. जागतिक मंदीच्या संकटात २०२० मध्ये भारताचा विकास दर सकारात्मक राहणार असून १.९ टक्के राहिल असा अंदाज आहे, असे दास यांनी सांगितले.

ठळकबाबी –

  1. गृह कर्ज, वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता
  2. आरबीआयकडून रिव्हर्स रेपो दर ४ टक्क्यांवरुन ३.७५ वर
  3. नाबार्डला २५ हजार कोटींची मदत
  4. देशातील मंदीशी लढण्याचा प्रयत्न आरबीआय करत आहे
  5. लघु बँकिंग क्षेत्रासाठी ५० हजार कोटी
  6. देशाकडे ११ महिने पुरेल इतके परकीय चलन उपलब्ध आहे
  7. मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगही सुरु आहे
  8. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा

 

News English Summary: Although the corona virus infection affected the economic situation, India’s growth rate for the current financial year is 1.9 percent. India will not go in the direction of negative growth under any circumstances, said RBI Governor Shaktikant Das. At the present stage, the Reserve Bank is taking various decisions to revive the economy. He communicated Friday morning to inform him. In this he informed about the new decisions taken by the Reserve Bank.

News English Title: Story Corona virus big announcement RBI reduce fixed reverse REPO Rate Covid19 crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x