13 December 2024 10:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

भारताचा विकास निम्याने घटणार; मोठ्याप्रमाणात आर्थिक अडचणी वाढणार

Corona Virus, Corona Crisis, Moody'd Report

नवी दिल्ली, २७ मार्च: करोनाला रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉक डाऊननंतर अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारपाठोपाठ रिझर्व्ह बँकेने आज मोठी घोषणा केली. बाजारात रोकड उपलब्धता वाढवण्यासाठी एसएलआर दर ३ टक्के करण्यात आला आहे. यामुळे बँकांना १.७ लाख कोटींची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे. याशिवाय आणखी दोन उपाययोजनांमुळे येत्या ३० जून पर्यंत बाजारात ३.७४ लाख कोटीची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार असल्याचे आरबीआयने म्हटल आहे. त्याशिवाय ३ महिने कर्जाचे हप्ते स्थगित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्याचे दास यांनी सांगितले.

तत्पूर्वी, कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली होती. देशात हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांना गोरगरीब जनता, कामगारांसाठी १ लाख ७० हजार कोटी जाहीर केले आहेत.

मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस या रेटिंग एजन्सीने चीन सोडल्यास भारत, अमेरिकेचा विकास दर घटणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. आज मुडीजने भारताचा २०२० वर्षाचा जीडीपीचा अंदाज ५.३टक्क्यांवरून केवळ २.५ टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार मूडीजने त्यांच्या ‘ग्लोबल मायक्रो आउटलुक 2020-21’ मध्ये म्हटले आहे की, अंदाजित विकास दरामध्ये भारतात २०२० मध्ये मोठी घसरण होणार आहे. यामुळे २०२१ मध्ये मागणी आणि आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा आधीपेक्षा अधिक पटींनी प्रभावित होण्याची शक्यता आहे. भारतातील बँका आणि वित्तीय कंपन्यांकडे रोखीची मोठी कमतरता असल्याने आधीच कर्ज देण्यासाठी अडचणी येत आहेत.

 

News English Summary: The rating agency of Moody’s Investors Service had predicted that India, US growth rate would decline if China leaves. Today, Moody’s has projected India’s GDP for 2020 to be only 2.5 percent, down from 5.3 percent. According to a PTI report, Moody’s said in their ‘Global Micro Outlook 2020-21’ that India is likely to witness a major fall in 2020, with projected growth rates. This is likely to affect the demand and the economic situation in 2021 more than ever. Banks and financial companies in India are already facing difficulties in lending due to the huge cash crunch.

 

News English Title: Story corona virus Indias GDP will decline 25 percent Moody’s News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x