...अन्यथा खासगी आणि सरकारी बँकांवरील लोकांचा विश्वासच उडेल: RBI माजी गव्हर्नर
नवी दिल्ली, १२ मार्च: भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी येस बॅंक प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी खूप वेळ होता. यासंदर्भात खूप दिवसांपासून चर्चा सुरु होती. एका खासगी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. गेल्या आठवड्यापासूनच रिझर्व बॅंकेने येस बॅंकेला आपल्या नियंत्रणात घेतले आणि ग्राहकांना ५० हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यावर बंदी लावली.
देशातील आर्थिक संस्थाची पडताळणी करण्याची इच्छाशक्ती न दाखवल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची ही स्थिती झाल्याचे राजन यावेळी म्हणाले. आर्थिक संस्थांमध्ये स्वच्छतेचे काम तात्काळ करायला हवे. असे न झाल्यास खासगी बॅंका, एनबीएफसी आणि सरकारी बॅंकांवरील लोकांचा विश्वास निघून जाईल. तसेच आर्थिक संस्था फायदा मिळवून देऊ शकत नाहीत असेही ते म्हणाले.
रिझर्व्ह बँकेच्या अकार्यक्षम देखरेख यंत्रणेचं पितळ येस बँकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा उघडं पडलंय. येस बँकेची आर्थिक स्थिती ढासळत असूनही, थकीत कर्जाचा आकडा वाढत असूनही बँकतून कर्जवाटपाचा ओघ सातत्याने सुरु होता. वास्तविक परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता दिसल्यावर रिझर्व्ह बँकेनं पावलं उचलणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही. साधारण १५ महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं पहिल्यांदा अवाजवी कर्जवाटपाची दखल घेऊन येस बँकेचे सीएमडी राणा कपूर यांना पदावरुन दूर करण्याचे आदेश दिले. पण तोवर जवळपास २लाख ४४ हजार कोटींचं कर्जवाटप झालं होतं.
तत्पूर्वी, देशाचा विकासदर घसरल्याच्या मुद्द्यावरुनही रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. ” लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर मोदी सरकारने राजकीय अजेंडा राबवण्यावर जास्त भर दिला. अर्थव्यवस्थेत येणाऱ्या समस्या सोडवण्याऐवजी सोशल अजेंड्याला जास्त महत्त्व दिलं. त्यामुळेच अर्थव्यवस्थेचा आलेख घसरला. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती दुर्दैवी आहे. केंद्र सरकारला फक्त राजकारणात रस आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्था ढासळण्यात होतो आहे. ” असंही रघुराम राजन यांनी म्हटलं होतं.
Former RBI governor Raghuram Rajan says slowdown in growth is due to current govt focussing more on meeting its political, social agenda rather than paying attention to economy
— Press Trust of India (@PTI_News) February 28, 2020
पुढे रघुराम राजन यांनी म्हटले होते की, सध्याच्या सरकारने निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेकडे लक्ष देण्यापेक्षा स्वत:चा राजकीय व सामाजिक अजेंडा पूर्ण करण्याला अधिक प्राधान्य दिले. अगोदरच नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) दोषपूर्ण अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. दुर्दैवाने, सरकारच्या या कार्यपद्धतीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग आणखीनच मंदावला, असे मत रघुराम राजन यांनी व्यक्त केलं होतं.
News English Summery: Former RBI governor Raghuram Rajan has targeted the government in the case of Yes Bank. There was a long time to go through this problem. Discussions had been going on for a long time. He was speaking in an interview to a private news channel. Since last week, the Reserve Bank has taken control of Yes Bank and banned its customers from withdrawing more than Rs.50,000. This bank has often informed us that we are in trouble. Raghuram Rajan said that it was too early to devise a plan to get YES Bank out of trouble. “I don’t know much about it,” he said. It is reported that the State Bank of India will acquire 48 percent stake in Yes Bank. I have been saying for years that financial institutions in the country should be verified. He said it was important for financial institutions to go ahead. “This is the state of the Indian economy,” Rajan said at the time.
Web News Title: Story there was well enough time to rescue YES Bank says former RBI Governor Raghuram Rajan.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC