17 April 2024 12:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

IFSC वाद: केंद्र सरकारच्या हेतूचे विश्लेषण होण्याची गरज - उद्योगमंत्री

IFSC controversy, Subhash Desai, PM Narendra Modi

मुंबई, २ मे: देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होण्याचं स्वप्न मोदी सरकारने गुंडाळलं आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच आयएफएससीचं मुख्यालय गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये होणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं असून याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट गिफ्ट सिटी आकारास येत आहे. त्यातच आता आयएफएससीचं मुख्यालय गांधीनगरला हलवल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.

प्रसिद्ध गुंतवणूक बँकर पर्सी मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मुंबईत महत्त्वाच्या पायाभूत सुविधा वाढवण्याची शिफारस केली होती. पण घाटकोपर-वर्सोवा मेट्रो याशिवाय शहराला काहीही मिळालं नाही. याशिवाय समितीने बँकिंग, सिक्युरिटीज, कमोडिटी आणि चलन व्यापार यामध्ये आणखी उदारमतवादी कायद्यांची शिफारस केली होती. याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं. एका बँकरच्या मते, आयएफएससीमुळे मुंबईत या सेवेशी संबंधित थेट एक लाख आणि अप्रत्यक्षपणे आणखी एक लाख रोजगार निर्माण केले असते.

आयएफएससीच्या प्रश्नावर तत्कालीन दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत डिसेंबर २०१७ ला लोकसभेत उत्तर दिलं होतं. देशात फक्त एकच आयएफएससी असू शकतं आणि ते गिफ्ट सिटीमध्ये असेल, असं ते म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करण्याचा हा डाव असल्याचं ते म्हणाले.

या पार्श्वभूमीवर सुभाष देसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रावरील मुंबईचा दावा हा नैसर्गिक आहे. कारण जगातील इतर देश मुंबईलाच भारताची आर्थिक राजधान म्हणून ओळखतात. देशातील अनेक वित्तीय संस्था आणि बँकांची मुख्यालये ही मुंबईतच आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासाठी (IFSC) मुंबईच योग्य असल्याचे सुभाष देसाई यांनी ठासून सांगितले.

केंद्राच्या निर्णयानंतर समजा इतर कुठे ओढूनताणून IFSC ची स्थापना झालीच तर त्याला फारसे यश मिळणार नाही. यश मिळाले तरी त्यासाठी खूप वेळ जावा लागेल. जगातील संस्थांनाही हे सोयीस्कर पडणार नाही. कारण, मुंबईसारख्या आर्थिक सोयी देशात इतरत्र कुठेच नाहीत. याउलट हे केंद्र मुंबईत असेल तर त्याला झटपट यश मिळेल. कारण, या केंद्रासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक रचना मुंबईत पहिल्यापासून तयार आहेत, असे देसाई यांनी सांगितले. केंद्राने परस्पर हे केंद्र गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला. परंतु, आम्ही शांत बसणार नाही. हे केंद्र मुंबईतच राहावे, यासाठी आम्ही प्रयत्न सुरु ठेवू. आम्ही केंद्र सरकारकडे या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणार असल्याची माहिती यावेळी सुभाष देसाई यांनी दिली. तसेच कितीही प्रयत्न झाले तरी मुंबईचे महत्त्व कमी करणे शक्य नाही. मात्र, यानिमित्ताने केंद्र सरकारच्या मनातील हेतूचे विश्लेषण होण्याची गरज सुभाष देसाई यांनी बोलून दाखविली.

 

News English Summary: Mumbai’s claim to the International Financial Services Center is natural. Because other countries in the world recognize Mumbai as the financial capital of India. Many financial institutions and banks in the country are headquartered in Mumbai. Therefore, Subhash Desai emphasized that Mumbai is the right place for the International Financial Services Center (IFSC).

News English Title: Story Union Government taking decision to locate IFSC authority directly without considering Maharashtra Government says Industrial Minister Subhash Desai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x