12 December 2024 1:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

कमी तिथे आम्ही, राजकीय दृष्ट्या कुचकामी सिद्ध झालेल्या दीपाली सय्यद आप पक्ष, शिवसंग्राम, शिवसेना नंतर शिंदे गटात प्रवेश करणार

Actrees Dipali Sayyad

Dipali Sayyad | मराठी अभिनेत्री आणि शिवसेना पदाधिकारी दिपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. स्वत: दिपाली सय्यद यांनी आपल्या प्रवेशाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर दिपाली सय्यद यांनी हे मोठं विधान केलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का अशा बातम्या पसरवल्या जातं असल्या तरी जमिनीवरील वास्तव वेगळं आहे.

विशेष म्हणजे राजकीय दृष्ट्या कुचकामी सिद्ध झालेल्या दीपाली सय्यद आप पक्ष, शिवसंग्राम, शिवसेना नंतर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. शिवसेनेत किंवा त्यापूर्वीच्या इतर पक्षात वायफळ वक्तव्यांशिवाय त्यांनी कोणतीही विशेष कर्तृत्व बजावलेलं नाही. केवळ आर्थिक बळावर एखादं निवडणुकीचं तिकीट मिळेल का या आशेने त्या शिंदे गटाकडे जातं असल्याचं म्हटलं जातंय. शिंदे गटाकडे महिला आघाडी नगण्य आहे. त्यात जो येईल तो मोठा अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. मात्र त्यांचा शिंदे गटाला काहीच फायदा नाही हे देखील राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

शिंदे गटात जाण्याचा पर्याय दीपाली सय्यद यांनी यापूर्वी देखील पूर्णपणे नाकारलेला नव्हता. तसेच पक्षात असूनही त्या शिवसेनेला काहीच कामाच्या नाहीत हे पक्षात देखील माहिती होतं. शिवसेना फ़ुटूनंतर शिवसेनेत नव्याने उपनेत्या झालेल्या सुषमा अंधारे यांनी राज्याचा दौरा करून अभ्यासपूर्ण शिंदे गटाला झोडपून तर काढलं, पण शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण केल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे सुषमा अंधारे यांचं राजकीय ज्ञान आणि विषयाची मांडणी करण्याची राजकीय कला पाहिल्यास दिपाली सय्यद त्यापुढे वजा शून्य आहेत. यावर स्पष्ट बोलायचे झाल्यास, शिंदे गटातील वायफळ बोलणाऱ्या नेत्यांना अजून एक वायफळ बोलणारी पदाधिकारी जॉईन होणार आहे असं राजकीय तज्ज्ञ सुद्धा मिश्कीलपणे बोलत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Actress Dipali Sayyad will join Shinde camp soon check details here 09 November 2022.

हॅशटॅग्स

#Actrees Dipali Sayyad(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x