13 December 2024 6:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

खाडीत कार कोसळून अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि प्रियकर शुभम देगडेचा मृत्यू

Actress Ishwari Deshpande

पणजी, २१ सप्टेंबर | कॅलनगुट येथील खाडीत कार कोसळून पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडे व शुभम देडगे या प्रेमिकांचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास पार्टी करून परतत असताना हा अपघात घडला. भरतीच्या वेळी खाडीत पाणी असल्याने दोघांचाही अपघातानंतर बुडून मृत्यू झाला.

खाडीत कार कोसळून अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि प्रियकर शुभम देगडेचा मृत्यू – Actress Ishwari Deshpande and Shubham Dedge die in car accident in Goa :

पुण्यातील शुभम देडगे आणि ईश्वरी देशपांडे हे मागच्या बुधवारपासून गोव्यात फिरायला आले होते. सोमवारी पहाटे पार्टी करून परतत असताना त्यांच्या गाडीवरील ताबा सुटून गाडी थेट खाडीत कोसळली. नेमकी याच वेळी भरतीची वेळ असल्यामुळे गाडी खोल पाण्यात कोसळल्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ईश्वरी देशपांडे हिने अलीकडेच एका मराठी व हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण केले होते.

शुभम आणि ईश्वरीच्या गाडीचे सेंट्रल लॉकमुळे गाडीतच अडकले होते. त्यांच्या नाकातोंडात पाणी घुसल्यामुळे त्यांच्या प्राथमिक उपचारासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या सहकार्याने गाडीसह दोघांचे मृतदेह बाहेर काढले. ईश्वरी देशपांडे आणि शुभम देडगे यांची काही वर्षांपासून मैत्री होती. त्यातूनच त्यांची मने जुळली होती. त्यामुळे पुढच्या काही महिन्यात साखरपुडा झाल्यावर दोघेही विवाहबंधनात अडकणार होते. मात्र, नियतीने त्यांच्यावर आधीच घाला घातला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Actress Ishwari Deshpande and Shubham Dedge die in car accident in Goa.

हॅशटॅग्स

#Accident(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x