15 December 2024 5:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Reshma Shinde | 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे बनली उद्योजिका, या बॉलीवूड अभिनेत्रीचं देखील आहे योगदान - Marathi News

Highlights:

  • Reshma Shinde
  • रेश्मा झाली उद्योजिका :
  • रेश्माची आत्तापर्यंतची कामगिरी :
  • बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आहे को-फाउंडर :
Actress Reshma Shinde

Reshma Shinde | ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचणारी आणि छोटा पडद्यावर काम करणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने आत्तापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. रेश्मा कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करत असते. मी तिच्या मालिकांमधील शूटिंग दरम्यानची सहकलाकारांसह मज्जा मस्ती करतानाची व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत असते.

दरम्यान रेश्माचा पांढरा वेस्टर्न गाऊन घातलेला एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रचंड प्रमाणात वायरल होताना पाहायला मिळतोय. या व्हिडिओमध्ये रेश्मा फारच सुंदर दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला असून ती एका युनिक ज्वेलरी शॉपमध्ये बागडताना दिसत आहे.

रेश्मा झाली उद्योजिका :

रेश्माने एका सुंदर ज्वेलरी शॉपचे दुकान उघडले आहे. तिच्या शॉपच नाव पालमोनास (Palmonas) असं असून तिने या ब्रँडबरोबर पार्टनरशिप करून हे शॉप उघडलं आहे. रेश्माने आपले शॉप उघडण्यासाठी पुणे शहर निवडलं आहे. पुण्यातील कोथरूड येथे शॉप ओपन करत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने असं कॅप्शन लिहिलं आहे की,”अभियानाच्या प्रवासात तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम केलंत आता एक नवीन प्रवास तुमच्या साक्षीने सुरू करते आहे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम सोबत असू दे”. असं कॅप्शन लिहून तिने तिच्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. तिच्या चहात्यांनी देखील कमेंटमध्ये हे कौतुकाचा वर्षाव करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रेश्माची आत्तापर्यंतची कामगिरी :

रेश्मा शिंदेने आत्तापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका छोट्या पडद्याला दिल्या आहेत. रेश्माने आत्तापर्यंत बंद रेशमाचे, लगोरी मैत्री रिटर्न्स, नांदा सौख्य भरे, चाहूल आणि रंग माझा वेगळा या मालिकांमध्ये रेशमाने काम केले आहे. तिची रंग माझा वेगळा या मालिकेमधील दीपा ही भूमिका प्रचंड गाजली. तिच्या या भूमिकेचे लाखो चाहते झाले होते. अजूनही दीप आहे पात्र अनेकांना विसरता येत नाही. काही चित्रपटांमध्ये रेशमाने काही सहाय्यक भूमिका देखील पार पाडले आहेत. तर अशा पद्धतीने, रेश्मा पूर्णपणे बिझनेसमध्ये व्यस्त राहणार की, छोट्या पडद्यावर कार्यरत राहणार असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आहे को-फाउंडर :

रेश्माने पालमोनास या ब्रँड अंतर्गत स्वतःचं शॉप उघडलं आहे. या शॉपची को-फाउंडर बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर असल्याचं समजतंय. श्रद्धा कपूरने देखील रेश्माच्या ज्वेलरी स्टोअरचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,”पुणेकरांनो नवीन पालमोनास ब्रँडचं स्टोअर उघडलं आहे. या निमित्ताने पहिल्या दिवशी एकावर एकच ज्वेलरी फ्री मिळणार आहे”. दोघींनी केलेल्या पोस्टला चहात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

Latest Marathi News | Actress Reshma Shinde Palmonas Shop 27 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Actress Reshma Shinde(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x